विधानसभानिहाय एक खिडकीची सोय करू : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 12:32 PM2019-09-13T12:32:45+5:302019-09-13T12:34:32+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची बैठक शाहू सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, लेखाधिकारी बाबा जाधव, निवडणूक नायब तहसीलदार दळवी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी बूथनिहाय बीएलए यांची नेमणूक करून निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे. ही निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे.
मतदार यादी वगळणीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणाºया निवडणूक खर्चाच्या विविध बाबींचा प्रारूप दर तक्ता तयार करण्यात आला असून, याबाबत तसेच निवडणूक खर्चासंबंधी तरतुदीची माहिती बैठकीत देण्यात आली.