अडथळ्यांवर कायदेशीर बंदी कोल्हापूर मनपाचा प्रस्ताव : आराखड्यात बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 09:23 PM2018-11-07T21:23:18+5:302018-11-07T21:24:12+5:30

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात येणाऱ्या अडथळ्यांना कायदेशीर बंदी घालण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे. बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात येणाºया अडचणी आणि प्रशासनाच्या मर्यादा यांवर उपाय

 Legislative ban on obstacles: Proposal of Kolhapur Municipal Corporation: Proposal required in the plan | अडथळ्यांवर कायदेशीर बंदी कोल्हापूर मनपाचा प्रस्ताव : आराखड्यात बदल आवश्यक

अडथळ्यांवर कायदेशीर बंदी कोल्हापूर मनपाचा प्रस्ताव : आराखड्यात बदल आवश्यक

Next

भारत चव्हाण ।
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात येणाऱ्या अडथळ्यांना कायदेशीर बंदी घालण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे. बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात येणाºया अडचणी आणि प्रशासनाच्या मर्यादा यांवर उपाय म्हणून हा प्रस्ताव समोर आला आहे. २०२० साली जो शहराचा विकास आराखडा तयार केला जाईल, त्यामध्ये मात्र बदल करावा लागणार आहे.

महापालिकेतील अधिकारीही यातील विशेषज्ञ नसल्यामुळे अडथळ्यांची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित राहिली आहे. महानगरपालिकेच्या कायद्यात या अडथळ्यांचा दूर करण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे कारवाई करायची तर कशी? असा प्रश्न सतावत असतो. गेल्या दोन दिवसांपासून जी अतिक्रमणे हटविली ती महापालिकेच्या अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांनी विनंत्या करून, धार्मिक परंपरेचे महत्त्व समोर आणून हटविली आहेत. परंतु संबंधित इमारतमालकांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले तर प्रशासनासमोरील अडचणी वाढू शकतात.

किरणोत्सवात अडथळा निर्माण करणाºया इमारती या सन १९४८ पूर्वीच्या असून, त्या तत्कालीन नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवाने घेऊन बांधलेल्या आहेत. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी होत्या. तरीही शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार, उपशहर अभियंता प्रत्येक वर्षी किरणोत्सवाच्या आठ ते दहा दिवस आधी किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळे आणि त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला येतो; परंतु पुढे कायमस्वरूपी कोणतीच उपाययोजना केली जात नाही.
 


महानगरपालिका प्रशासन सन २०२० मध्ये नवीन विकास आराखडा जाहीर करेल. या आराखड्यात किरणोत्सवातील अडथळ्यांना बंदी करणाºया गोष्टींचा समावेश केला पाहिजे. ‘नगररचना’च्या अखत्यारीतील हा प्रश्न असला तरी आतापासूनच विचार आवश्यक आहे.
- एस. के. माने ,उपशहर अभियंता

Web Title:  Legislative ban on obstacles: Proposal of Kolhapur Municipal Corporation: Proposal required in the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.