विधायक विचार मंचचे ‘मिशन २०२१’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:56+5:302021-02-09T04:25:56+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी लोकप्रतिनिधी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, लोकाभिमुख असा निवडावा, या उद्देशाने विधायक विचार नागरिक मंच, ...

Legislative Thought Forum's 'Mission 2021' | विधायक विचार मंचचे ‘मिशन २०२१’

विधायक विचार मंचचे ‘मिशन २०२१’

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी लोकप्रतिनिधी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, लोकाभिमुख असा निवडावा, या उद्देशाने विधायक विचार नागरिक मंच, कोल्हापूर लोकचळवळ व नांदोलन परिवार यांच्यावतीने रविवारी ‘मिशन २०२१’ हे अनोखे जनजागृती अभियान सुरु करण्यात आले.

बिनखांबी गणेश मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष नयन प्रसादे यांच्या प्रमुख उपस्थितीत याची सुरुवात झाली. सर्वसामान्य व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांना महापालिकेची निवडणूक लढवयाची असते. धनदांडग्यांसमोर त्यांचे आव्हान असते. अशास्थितीत त्यांच्या मनातील अनेक गोष्टींचा कोंडमारा सोडवणे व त्यांना जनपाठिंब्याचा विधायक मार्ग दाखवणे आणि मतदारांनी चांगला आणि प्रामणिक उमेदवार निवडून द्यावा, असे या उपक्रमाचा दुहेरी उद्देश आहे. यामध्ये संबंधित उमेदवार अथवा मतदाराचे नाव, व्हॉट्सॲप नंबर घेऊन ‘मिशन २०२१’ या नावाने सध्याचे वास्तव, उमेदवार कसा अपेक्षित आहे, जनतेचा अनुभव व सामान्य उमेदवारांना निवडणूक लढविण्याचे असणारे आवाहन यासंदर्भात सविस्तर असा मजकूर पाठवला जातो.

फोटो : ०८०२२०२१ कोल केएमसी मतदार जागृती

ओळी : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधायक विचार मंचच्यावतीने मतदार, इच्छुक यांच्या जनजागृती उपक्रमाला रविवारी बिनखांबी गणेश मंदिर येथून सुरुवात झाली.

Web Title: Legislative Thought Forum's 'Mission 2021'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.