शिवडाव येथे आढळली बिबट्याची नखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:26+5:302021-09-04T04:30:26+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, पुनर्वसन वसाहत, सिद्धानंदनगर शिवडाव येथे वन विभागाला मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) नवनाथ कांबळे यांच्या ...

Leopard claws found at Shivdav | शिवडाव येथे आढळली बिबट्याची नखे

शिवडाव येथे आढळली बिबट्याची नखे

googlenewsNext

याबाबत अधिक माहिती अशी, पुनर्वसन वसाहत, सिद्धानंदनगर शिवडाव येथे वन विभागाला मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) नवनाथ कांबळे यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये वास्कर याच्या राहत्या घरी बिबट्याची तीन नखे व अन्य रानटी प्राण्याचे मास, बारा बोअर बंदूक, तेरा जिवंत काडतुसे आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद करून वास्कर याला ताब्यात घेतले. वनक्षेत्रपाल युवराज पाटील, अशोक वाडे, किशोर आहेर, सुनील खोत, वनपाल संदीप शिंदे, वनरक्षक जॉन्सन डिसोझा, सागर पटकारे, सागर यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. वास्कर हे निवृत्त पोलीस पाटील असून त्याचा मधमक्षिका पालनाचा व्यवसाय आहे.

वास्कर मधपेठ्या लावण्याच्या निमित्ताने जंगलात वावरत असतात. मागील आठवड्यातच कडगाव परिक्षेत्रात गवा संशयास्पद मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत सापडला. या विभागात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढते प्रमाण असून, वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे, ही चिंतेची बाब आहे.

वन्यजीवांच्या शिकारींवर निर्बंध आणण्यासाठी शासनाने केलेला वन्यजीव संवर्धन कायदा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीचा सर्वोत्तम कायद्यांपैकी एक आहे. मात्र, शिकार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक असलेली तपास यंत्रणा, वन कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती, तपासातील अडथळे अशा अनेक कारणांमुळे शिकार करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत.

विरप्पनचा प्रभाव

मोठ्या झुबकेदार मिशा, गोल हॅट, ओपन जीप, पाठीवर बंदूक असा नेहमी वावर असणाऱ्या वास्करवर दक्षिणेतील कुख्यात चंदन तस्कर विरप्पन याच्या स्टाईलचा प्रभाव दिसतो.

फोटो : ०३ शिवडाव धाड

शिवडाव- बिबट्याच्या नख्या सापडल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी वसंत वास्कर. सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.

०३ वसंत महादेव वास्कर आरोपी

Web Title: Leopard claws found at Shivdav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.