बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:13 PM2020-10-10T17:13:07+5:302020-10-10T17:20:31+5:30
leopard, kolhapurnews, forestdepartment, kolhapurnews सादळे येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता.बिबट्याने दोनदा रस्ता पास केला पण बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही.
शिरोली : सादळे येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता.बिबट्याने दोनदा रस्ता पास केला पण बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही.
मंगळवार रात्री साडे नऊ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन मोटारसायकल वरून जाणार्या दुचाकी वाहन प्रवाशाला झाले.यावेळी बिबट्या रस्त्या शेजारीच येऊन बसला होता. बुधवारी आणि गुरूवारी रात्री सात ते दहा या वेळात दोन दिवस बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते.
या काळात बिबट्या ने दोन कुत्री, दोन मोरांची शिकार केली होती. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला हा सापळा कोल्हापूरच्या दिशेला व्हॅलीत लावला होता. पण बिबट्या सापळ्याच्या जवळपास गेला नाही.
सोशल मिडीयावरून काही लोक सादळे मादळे परिसरात चार बिबटे आहेत, तर केंट क्लब येथे बिबट्या आलेला आहे असे चुकीचे व्हिडिओ टाकून दिशाभूल करत असल्याचे वनविभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.