जोतिबा डोंगराच्या पायथ्याला बिबटया, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 11:55 IST2022-10-10T11:30:06+5:302022-10-10T11:55:49+5:30
पुन्हा बिबटयाचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

जोतिबा डोंगराच्या पायथ्याला बिबटया, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जोतिबा : जोतिबा डोंगराच्या पायथ्याला पुन्हा बिबटयाचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाणेवाडी गिरोली मार्गावरील सारकाल परिसरात काल, रविवारी सायंकाळच्या सुमारास भाविक प्रवाशांना बिबट्या दिसला. हौसी फोटोग्राफरने कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद केला.
जोतिबा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या सारकाल परीसरात गेल्या अनेक वर्षापासून वाघाच्या वास्तव्याची दगडी घळ आहे. याठिकाणी बिबटयाचा वावर आहे. दरम्यान काल, पुन्हा काही भाविक प्रवाशांना बिबट्या दिसला. यापरिसरात मोठी शेती असून शेतकरी, जनावरांचा वावर असतो. वाघबीळ ते सादळे मादळे गावातून पुणे -बेंगळुरु महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. याच मार्गावर या बिबट्याचे दर्शन झाले असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबटयाला पकडुन सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.