कुंभार्ली घाटात बिबट्याचे कातडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 06:37 PM2017-06-21T18:37:36+5:302017-06-21T18:37:36+5:30
पुण्याच्या तरुणास अटक
आॅनलाईन लोकमत
चिपळूण, दि.२१ : पाटण (जि. सातारा) येथून बिबट्याचे कातडे घेऊन जाणाऱ्या प्रौढाला कुंभार्ली घाटात रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
दिपक हनमंत पावसकर (४१, धनकवडी पुणे, मूळ सनबूर, पाटण, जि. सातारा) हा शेवरोले गाडीतून (एमएच-१२/एनएक्स-०११२)मधून बिबट्याचे कातडे घेउन निघाला होता. याबाबतची खबर मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक प्रणय अशोक व अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांनी ही कारवाई केली.गाडीच्या डीकीमध्ये हे कातडे लपवण्यात आले होते. या कातड्याची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गाडीही जप्त केली असून पावसकर याला अटक केली आहे.