असू दे मीटर बंद; भाडं फिक्स!

By admin | Published: February 18, 2015 10:41 PM2015-02-18T22:41:43+5:302015-02-18T23:49:13+5:30

मनमानीला चाप : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ठरवून दिले अंतरानुसार रिक्षाभाडे

Let be the meter off; Rent fixes! | असू दे मीटर बंद; भाडं फिक्स!

असू दे मीटर बंद; भाडं फिक्स!

Next

सातारा : बसस्थानकावर उतरून रिक्षा करावी तर बसताक्षणी ‘सत्तर रुपये होतील’ हे वाक्य अनेकदा ऐकावं लागतं. ‘मीटरप्रमाणं घ्या’ म्हटलं की ‘मीटर बंद आहे,’ हे ठरलेलं उत्तर. मनमानी भाडेआकारणीच्या अनेक तक्रारी आल्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी यावर रामबाण उपाय शोधला आहे. बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतरानुसार प्रवासभाडे किती होते, याची यादीच त्यांनी प्रकाशित केली असून, त्यानुसारच भाडे द्यावे, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.
शहरातील सर्व आॅटोरिक्षाचालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली. परंतु हे मीटर नादुरुस्त आहेत, असे भासवून अनेक रिक्षाचालक प्रवाशांकडून जादा दराने भाडेआकारणी करतात, अशा तक्रारी येऊ लागल्या. बऱ्याच वेळा ‘सातारचे रस्ते खराब असून, त्यामुळे मीटर नीट चालत नाही. मीटर बिघडतो,’ असेही रिक्षाचालकांकडून सांगितले जाते. एखाद्या ठिकाणी ‘येताना रिकामे यावे लागते,’ असे कारण सांगूनही जादा भाडे आकारले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतर मोजून अंदाजे भाडेदर निश्चित केले. त्याहून अधिक भाडे देऊ नये, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले आहे. (प्रतिनिधी)

गुपचूप  करा तक्रार

अंतरानुसार अंदाजे भाडेदर जाहीर केले असून, मीटरपेक्षा अधिक भाड्याची मागणी रिक्षाचालकाने केल्यास तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तक्रारीत रिक्षा क्रमांक, प्रवासाचा दिनांक, वेळ, स्थळ, तक्रारीचे स्वरूप यासह तक्रारदाराचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. तक्रारदाराचे नाव उघड करण्यात येणार नाहीे. तसेच सर्व रिक्षाचालकांनी आपले मीटर निर्दोष असल्याची खात्री करावी. मीटर खराब, नादुरुस्त तसेच बंद असणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतर (किमीमध्ये) व रिक्षाभाडे
जिल्हा परिषद१.८२४.००
बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे २.७३७.००
कृष्णानगर (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ३.०४१.००
संगमनगर (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ४.१५६.००
रेल्वे स्टेशन (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ७.५ १०४.००
शिवराज पेट्रोल पंप३.३४५.००
गोडोली नाका २.०२७.००
देगाव फाटा (गोडोली नाकामार्गे)४.६६३.००
गणेश चौक (गोडोली नाकामार्गे)५.२७२.००
कोडोली (गोडोली नाकामार्गे)५.८८०.००
अ‍ॅरिस्टोक्रॅट (गोडोली नाकामार्गे)७.१९८.००
अजिंक्यबझार चौक शाहूनगर १.७२३.००
(मोनार्कमार्गे)
गुरुकुल शाळा (मोनार्कमार्गे)२.४३३.००
राजवाडा (कमानी हौदमार्गे)२.९४०.००
समर्थमंदिर (कमानी हौद, ३.७५०.०० राजवाडामार्गे)
बोगदा (कमानी हौद, ४.०५५.००
राजवाडामार्गे)
मंगळवार तळे (कमानी हौद, ३.४४७.००
राजवाडामार्गे)
समर्थमंदिर (अदालत वाडामार्गे)३.३४५.००
बोगदा (अदालत वाडामार्गे)४.५६२.००
शाहूपुरी (रिमांड होममार्गे)२.९४०.००
सदरबझार चौक (रिमांड होममार्गे)२.०२७.००
वाढे फाटा (पोलीस परेड ३.०४१.००
ग्राउंडमार्गे)
मोळाचा ओढा २.९४०.००
तामजाईनगर (पोदार स्कूल)२.३३१.००
पिलेश्वरनगर२.०२७.००

Web Title: Let be the meter off; Rent fixes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.