पेन्शनसाठीप्रसंगी आंदोलन करू : आमदार जयंत आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:28+5:302021-03-23T04:24:28+5:30

आजरा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेस त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. संस्थाध्यक्ष गजानन चिगरे यांच्या हस्ते आमदार ...

Let's agitate for pension: MLA Jayant Asgavkar | पेन्शनसाठीप्रसंगी आंदोलन करू : आमदार जयंत आसगावकर

पेन्शनसाठीप्रसंगी आंदोलन करू : आमदार जयंत आसगावकर

Next

आजरा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेस त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

संस्थाध्यक्ष गजानन चिगरे यांच्या हस्ते आमदार आसगावकर यांचा सत्कार झाला. संस्थेचा आढावा चिगरे यांनी मांडला. २००५ पूर्वी ज्या शाळांना टप्पा अनुदान मिळाले होते, अशा शाळेतील शिक्षकांना पेन्शन योजनेत समाविष्ट केले नसल्याचे संचालक संजीव देसाई यांनी सांगितले. अनेक माध्यमातून प्रयत्न करूनही अद्याप यश आलेले नसल्याची व्यथा मांडली.

आजरा तालुका माध्यमिक पतसंस्थेची वाटचाल चांगली आहे. येथे सभासदाभिमुख कारभार होत असल्याबद्दल संचालक मंडळाचे आमदार आसगावकर यांनी कौतुक केले. शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुका चर्चेचा विषय असतो. यातून हा पेशा बदनाम होत आहे. हे कटाक्षाने टाळणे गरजेचे असल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगून पेन्शन योजनेत ज्या शिक्षकांना समाविष्ट केलेले नाही, अशांसाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. प्रसंगी यासाठी आपण आंदोलन करून यश मिळवू, अशी ग्वाही दिली.

यावेळी संस्था उपाध्यक्ष अभिजीत देसाई, संचालक शिवाजी गुरव, शिवाजी तांबेकर, रवींद्र पाटील, शरद पाटील, अस्मिता पुंडपळ, चंद्रकांत पाटील, ईश्वर शिवणे, माजी संचालक सुनील देसाई, सचिव बशीर मुल्ला आदी उपस्थित होते.

Web Title: Let's agitate for pension: MLA Jayant Asgavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.