थुंकण्याऱ्यांविरोधात आता फिरते पथक नेमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 08:08 PM2020-11-04T20:08:01+5:302020-11-04T20:10:08+5:30

antispitmovement, commissioner , muncipaltyCarportaion, kolhapurnews थुंकण्याविरोधात कोल्हापूरातून सुरु झालेली चळवळ कौतुकास्पद आहे. ही चळवळ कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास कारणीभूत ठरेल. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या धर्तीवर फिरती पथक तैनात करण्याचा विचार असल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी शिष्टमंडळाला दिले.

Let's appoint a mobile squad against the spitters | थुंकण्याऱ्यांविरोधात आता फिरते पथक नेमू

 विविध मागण्यांसाठी कोल्हापूरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीमार्फत बुधवारी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले.

googlenewsNext
ठळक मुद्दे थुंकण्याऱ्यांविरोधात आता फिरते पथक नेमूआयुक्तांचे आश्वासन : थुंकण्याविरोधात चळवळीचे केले कौतुक

कोल्हापूर : थुंकण्याविरोधात कोल्हापूरातून सुरु झालेली चळवळ कौतुकास्पद आहे. ही चळवळ कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास कारणीभूत ठरेल. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या धर्तीवर फिरती पथक तैनात करण्याचा विचार असल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी शिष्टमंडळाला दिले.

कोल्हापूरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीमार्फत महिन्यापूर्वी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकून संक्रमणाचा तसेच रोगराई पसरविण्याचे काम करत आहेत. याविरोधात ताराराणी चौकातून कोल्हापूरातील नागरिक आणि संघटनांनी एकत्र येत ही मोहिम सुरु केली आहे.

महानगरपालिकेने गर्दीच्या ठिकाणी, शहराच्या प्रवेशद्वारावर थुंकण्याची मनाई करण्याची होर्डिंग, फलक लावावेत, महापालिका मालकीच्या सर्व इमारतींवर थुंकणे प्रतिबंधित क्षेत्र होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जबर दंड आकारावा, अशा मागण्यांचे निवेदन चळवळीतर्फे आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. शिष्टमंडळात दीपा शिपुरकर, सारिका बकरे, गीता हसूरकर, सागर बकरे, अभिजित गुरव, निखिल कोळी, आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर सहभागी झाले होते.

 

Web Title: Let's appoint a mobile squad against the spitters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.