आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:09+5:302020-12-24T04:23:09+5:30

उत्तूर : रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून लाभक्षेत्रात पाणी मिळावयाचे असल्यास धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील लाभधारक ...

Let's complete the work of Ambeohol dam | आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण करूया

आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण करूया

googlenewsNext

उत्तूर : रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून लाभक्षेत्रात पाणी मिळावयाचे असल्यास धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील लाभधारक यांच्यात समन्वयाची गरज आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करूया, धरणाचे काम पूर्ण करूया, असे प्रतिपादन कॉ. संपत देसाई यांनी आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे लाभधारक व धरणग्रस्त यांना मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते. कॉ. संपत देसाई म्हणाले, लाभधारक शेतकरी व धरणग्रस्त यांच्यात समन्वयाची चांगली गोष्ट आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पुनर्वसनाचे काम पुढे घेऊन जायचे आहे. केवळ संघर्ष करून प्रश्न सुटेल असे सांगता येत नाही. सत्तेचा वापर सामान्याच्या उन्नतीसाठी आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे ताकद आहे. त्यांना घेऊन धरणग्रस्त व लाभधारक एकत्र येऊन आराखडा तयार करून घेऊया.

संकलन रजिस्टर दुरुस्ती सुरू झाली आहे. पुनर्वसनाचा गावनिहाय आराखडा तयार करूया. पॅकेजच्या अडचणी किती आहेत हे गावनिहाय समजून घेऊया. त्यानुसार मागणी करूया, पुनर्वसन केले तर धरणाचे काम सुरू राहील. लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. चांगल्या जमिनी दाखवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आग्रह करूया. कडगाव व लिंगनूर येथील भूखंड वाटपाबाबत तातडीने द्यावा. घळभरणीच्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे. काशिनाथ तेली म्हणाले, अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे संकलन दुरुस्तीचे काम ताबडतोब करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. जमिनी चुकीच्या व नाकारलेल्या दाखवतात. संजय येजरे म्हणाले, ८२२ धरणग्रस्तांपैकी ३५५ धरणग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन लादण्यात आले. याबाबत मा. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ६५ टक्के रक्कम भरून घेतली जात नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. शंकर पावले म्हणाले, पुनर्वसनाचा खोडा हा धरणग्रस्तांनी केला नाही, तो अधिकाऱ्यांनी केला. २००४ मध्ये ७०० हेक्टर उपलब्ध असणारी जमीन कोठे आहे. धरणग्रस्तांनी काम बंद पाडण्यास अधिकारीच जबाबदार आहे. योग्य अधिकाऱ्यांची निवड करा, पुनर्वसन करा, धरणाला विरोध नाही.

वसंतराव धुरे म्हणाले, पुनर्वसनासाठी प्रयत्न करून प्रकल्पात पाणीसाठा करूया. शेतीसाठी परिसर सुजलाम..सुफलाम करूया.

यावेळी पं. स. सदस्य शिरीष देसाई, विठ्ठल कदम, विजय वांगणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मारुती घोरपडे, दीपक देसाई, भिकू गुरव, मच्छिंद्र कडगावकर, बबन पाटील, सुरेश खोत, गणपतराव सांगले, शशिकांत लोंखडे, नेताजी पाटील, शहाजी पाटील, संग्राम पाटील, आदींसह धरणग्रस्त व लाभधारक उपस्थित होते.

-----------------

* एकत्रित लढूया, पुनर्वसनासाठी सर्व पक्ष, संघटना यांनी एकत्रित येऊन मतभेद बाजूला ठेवून पुनर्वसनाबरोबरच धरणाचे काम सुरू राहील. मुश्रीफ यांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका लाभधारक व धरणग्रस्त यांनी मांडून एकत्रित लढूया, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली.

-------------------------

* फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्त व शेतकऱ्यांना कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २३१२२०२०-गड-०३

Web Title: Let's complete the work of Ambeohol dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.