रक्ताचं नातं जोडू, माणुसकीची ज्योत तेवत ठेवू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:46+5:302021-07-03T04:15:46+5:30
‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा ...
‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देत २ ते १५ जुलैदरम्यान जिल्ह्यात हे महारक्तदान शिबिराचे अभियान चालवले जाणार आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील शाडू ब्लड सेंटरमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक व ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग, सचिव केदार राठोड, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, विक्रम चहाचे एरिया सेल्स मॅनेजर अभिजित देशमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान हे मौल्यवान दान आहे, सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा आहे. शासनाकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करा, असे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेतलेल्या रक्तदान शिबिर मोहिमेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि राज्यातून ५० हजारच नव्हे, तर १ लाख पिशव्या रक्ताचे संकलन व्हावे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात २० हजार पिशव्या इतके कमी रक्त शिलल्क आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्हा, तालुके व गावागावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.
उद्घाटन सत्रानंतर दिवसभर रक्तदानासाठी नागरिकांची शाहू ब्लड सेंटरवर गर्दी होती. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांंनी रक्तदान करून या अभियानात सहभाग नोंदविला.
---
पहिला दाता
रक्तदान शिबिराचे उद्घाटन होण्यापूर्वीच अनेक नागरिक रक्तदानासाठी आले होते. बांधकाम साहित्याचा व्यवसाय असलेले सोहेल जमादार हे या अभियानाचे पहिले रक्तदाते ठरले. मी ‘लोकमत’चा नियमित वाचक आहे. गेली तीन-चार दिवस रक्तदानाच्या बातम्या वाचत होतो. चांगल्या कार्यात आपलेही योगदान असावे म्हणून मी रक्तदानासाठी पुढे आलो. ‘लोकमत’च्या या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
--
फोटो नं ०२०७२०२१-कोल-सोहेल जमादार
--
लग्नाचा वाढदिवस रक्तदानाने...
येथील जाहिरात एजन्सीचे मालक मंदार व अनुजा तपकिरे यांच्या लग्नाचा शुक्रवारी पाचवा वाढदिवस होता. हा दिवस त्यांनी रक्तदानाने साजरा केला. ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराची सुरुवात केली त्यावर्षीपासून मी या अभियानाशी जोडलो आहे. एकाने रक्तदान केल्याने तीन लोकांचा जीव वाचतो. कोरोनाच्या या परिस्थितीत सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही दोघांनीही रक्तदान केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
--
आजचे शिबिर
सकाळी १० ते ४ : जीवनधारा ब्लड बँक, राजारामपुरी, कोल्हापूर
सकाळी ९ ते २ : एस. जे. फौंडेशन, त्र्यंबोली लॉन, लाईन बझार, कोल्हापूर
---
फोटो नं ०२०७२०२१-कोल-मंदार तपकिरे
मंदार व अनुजा तपकिरे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस शुक्रवारी रक्तदानाने साजरा केला.
----
फोटो नं ०२०७२०२१-कोल-रक्तदान शिबीर०१
ओळ : ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’च्यावतीने शु्क्रवारपासून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागाळा पार्क येथील शाहू ब्लड सेंटर येथे झाला. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे मेघराज चुग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२
शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
--
कंपोझिट लोगो वापरावा