गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:05+5:302021-02-08T04:21:05+5:30

गांधीनगर : राज्यात गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण करू असे आश्वासन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले. गांधीनगर (ता. ...

Let's create a different identity of Gandhinagar | गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण करू

गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण करू

Next

गांधीनगर : राज्यात गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण करू असे आश्वासन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले. गांधीनगर (ता. करवीर) येथे कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मान समारंभात आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष गुवालदास कट्यार होते. प्रमुख पाहुणे होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश उर्फ पप्पू अहुजा होते.

बंटी पाटील ग्रुप, विशाल पहुजा फाऊंडेशन व माजी ग्रामपंचायत सदस्य धीरजकुमार तेहल्यानी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधी सेंट्रल पंचायतीच्या गुरुनानक हॉलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

ऋतुराज पाटील म्हणाले, येथील समस्यांबाबत एकत्रित बसून आराखडा तयार करून विकासाला चालना देऊ. तत्पूर्वी गांधीनगरसह सर्व ग्रामपंचायतींना बांधकाम परवाने देण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी धीरजकुमार तेहल्यानी यांनी केली. होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अहुजा यांनी बाजारपेठेमध्ये सुलभ शौचालय व सिक्युरिटीसाठी कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी केली तर सर्व एक्सप्रेस रेल्वे वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात याव्यात अशी मागणी सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गुवालदास कट्यार व माजी सरपंच प्रेम लालवाणी यांनी केली.

ऋतुराज पाटील आमदार झाल्यानंतर गांधीनगरमधील पहिल्याच कार्यक्रमाला आल्याने विशाल पहुजा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भारतीय सिंधू सभा, सिंधी कौन्सिल ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचा व ग्रामपंचायतीचे साफसफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. शबाना मोमीन, वैशाली मोरे, हेमलता माने, जहिदा इनामदार यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपसरपंच सोनी सेवलाणी, अशोक तेहल्यानी, माजी सरपंच पूनम परमानंदानी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अमोल महापुरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी ग्रामपंचायत सदस्य धीरजकुमार तेहल्यानी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गांधीनगर येथे कोरोना योद्ध्यांच्या सन्मान समारंभात आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेजारी गुवालदास कट्यार, सुरेश अहुजा, अशोक तेहल्यानी, चंदन चव्हाण, दिलीप कुकरेजा आदी उपस्थित होते.

Web Title: Let's create a different identity of Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.