महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करूया

By Admin | Published: December 27, 2015 01:19 AM2015-12-27T01:19:52+5:302015-12-27T01:27:40+5:30

विनय कोरे यांनी डागली तोफ : मालोजीराजेंच्या उपस्थितीने धक्का

Let's dispel mood swings | महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करूया

महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करूया

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटाच असा आहे की, सातत्याने आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात लढत आलो आहे. या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून या प्रवृत्तीला जिल्ह्यातून हद्दपार करूया, अशी तोफ जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत डागली.
या बैठकीस उपस्थित राहून माजी आमदार मालोजीराजे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माझे चार मतदार सतेज पाटील यांनाच मतदान करतील, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले. पुण्यातील आलिशान हॉटेलमध्ये मतदारांसमवेत ही बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या मतदारांना चांगलीच तंबी दिली.
कोरे म्हणाले, ‘आता या व्यासपीठावर असलेल्या सर्व नेत्यांनी महाडिक यांच्यासंबंधीची भूमिका वेळोवेळी बदलली आहे; परंतु आमचे महाडिक यांच्याशी कधीच जमले नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरी मी महाडिक यांना मदत करण्यास नकार दिला; महाडिक यांचे दलबदलू राजकारण मला कधीच मान्य नाही. ही माझी भूमिका यापूर्वीही होती व तीच यापुढेही राहील. काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्या महाडिक यांच्याबाबतची भूमिका पी. एन. पाटील यांनी जाहीर करावी.’ हसन मुश्रीफ म्हणाले, ‘दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमुळे आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची सर्वांवर जबाबदारी आहे. त्यात कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही.’
पी. एन. पाटील यांनी सर्व सदस्यांनी सतेज पाटील यांना मतदान करून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याच्या सूचना दिल्या. या निवडणुकीत जे नेते या व्यासपीठावर एकत्र आले आहेत, त्यांनी भविष्यातील राजकारणातही असेच एकत्र राहावे, अशी अपेक्षा ‘पी. एन.’ यांनी व्यक्त केली.
जयंत पाटील पोलिंग एजंट
गेल्या निवडणुकीतील आमदार महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढविलेले जनसुराज्य पक्षाचे प्रा. जयंत पाटील हे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे पोलिंग एजंट आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरी मी महाडिक यांना मदत करण्यास नकार दिल्याचे कोरे यांनी सांगितले.
महाडिक यांचे दलबदलू राजकारण मला कधीच मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी’चा व्हिप
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका व महापालिकेचे नगरसेवक यांनी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांना मतदान करावे. मतदान प्रक्रियेत पक्षविरोधी काम केल्यास कारवाई करण्यात येईल, असा व्हिप जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी शनिवारी सायंकाळी मतदारांना बजावला. हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने व्हिप बजावूनही त्याचा उपयोग होणार नसल्याने कॉँग्रेसने मात्र व्हिप लागू न केल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Let's dispel mood swings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.