पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करू : आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:56+5:302021-07-20T04:17:56+5:30
खोची : खासगी पशुधन पर्यवेक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. पशुधन व्यवसायासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणीची माहिती पशुसंवर्धन मंत्री ...
खोची : खासगी पशुधन पर्यवेक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. पशुधन व्यवसायासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणीची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनिओ केदार यांना भेटून सांगण्यात येईल, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील खासगी पशुधन पर्यवेक्षक पदविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन आमदार राजू आवळे यांना महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर दिले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबद्दलची माहिती दिली. या अन्यायकारक निर्णयाचा निषेध करून गुुरुवारपासून (दि. २२) बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजार ५०० पशुधन पर्यवेक्षक आहेत. सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहेत.
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील पशुधन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
यावेळी रामचंद्र सूर्यवंशी, रजनीकांत अवताडे, रणजित पाटील, बंदेनवाज मुजावर, आनंदा चरणे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - हातकणंगले तालुका खासगी पशुधन पर्यवेक्षक पदविका संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन आमदार राजू आवळे यांना देण्यात आले. यावेळी आप्पासाहेब पाटील, रामचंद्र सूर्यवंशी, रजनीकांत अवताडे, रणजित पाटील, बंदेनवाज मुजावर, आशिष घाटगे, विजय शेळके, करण जामदार उपस्थित होते. (छाया - आयुब मुल्ला)