चला, शाळा प्रवेशाची माहिती एकाच छताखाली घ्या
By admin | Published: March 24, 2016 10:51 PM2016-03-24T22:51:23+5:302016-03-24T23:44:21+5:30
‘लोकमत’तर्फे आयोजन : ‘मिशन अॅडमिशन-समर कॅम्प एक्स्पो’चा आजपासून प्रारंभ
कोल्हापूर : मुलांसाठी शाळा निवडताना पालकांना कसरत करावी लागते. त्यांची कसरत थांबविण्यासह शाळा निवडीची प्रक्रिया सुसह्य करण्यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापुरात ‘मिशन-अॅडमिशन-समर कॅम्प एक्स्पो २०१६’ हे प्रदर्शन आयोजित केले
आहे. राजारामपुरीतील कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात आज, शुक्रवारपासून तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पेठवडगावच्या नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी पोलिस आयुक्त आणि शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, नेक्सा कोल्हापूर सेंट्रल साई सर्व्हिसचे शोरूम मॅनेजर राजेंद्र मुसळे प्रमुख उपस्थित असतील.प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक
डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल, तर सहप्रायोजक नेक्सा कोल्हापूर सेंट्रल साई सर्व्हिस हे आहेत.
प्रदर्शन आज, शुक्रवार ते रविवार (दि. २७) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे.
यामध्ये नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळा प्रवेशाची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मार्चअखेरीस मुलांच्या प्रवेशासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शाळांची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू
होते. त्यासाठी त्यांना शाळांची शोधाशोध करावी लागते; पण, ‘मिशन- अॅडमिशन-समर कॅम्प एक्स्पो २०१६’ प्रदर्शनामुळे यावर्षी पालकांची धावपळ थांबणार आहे. शिवाय त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचतही होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रदर्शनात शाळांच्या सुविधा, शुल्क आणि विविध उपक्रमांची माहिती अशा स्वरूपातील मुलांच्या प्रवेशाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पालकांना एकाच छताखाली मिळणार आहेत. शाळांच्या प्रतिनिधींशी पालकांना थेट चर्चा करता येणार आहे. त्यामुळे त्यांना मुलांसाठी चांगली शाळा निवडण्यास मदत होणार आहे. शिवाय घरापासून जवळ असलेल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण
देणाऱ्या शाळा, त्या शाळांकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रवेश शुल्क किती आणि त्याची आकारणी कशी होते, व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणते उपक्रम शाळा राबविते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तसेच समर एक्स्पोमध्ये कोचिंग क्लासेस, अबॅकस, बुद्धिमापन, हस्ताक्षर क्लासेसची माहिती मिळणार आहे. त्यासह शाळांनाही पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्रदर्शनाने मिळाली आहे.
नामांकित संस्थाचा सहभाग
या प्रदर्शनात डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल, मारुती नेक्सा, रॉयल इंग्लिश स्कूल, एलिक्झर एज्युकेअर, संजीवन नॉलेज सिटी, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, बार्बी वर्ल्ड प्री-प्रायमरी स्कूल, संजीवन इंटरनॅशनल स्कूल, युरो किडस् स्पोर्टी बिन्स, एकलव्य पब्लिक स्कूल, कार्यन्स अॅन इंटरनॅशनल प्री-स्कूल, रोबो लॅब, रॉयल आर्यन्स स्कूल, पन्हाळा; पोदार इंटरनॅशनल स्कूल, दि इमॅजिका पन्हाळा समर कॅम्प, चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन, इंडिया फर्स्ट रोबोटिक अकॅडमी, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, दिशा इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स (डायस), एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, ब्रेन मास्टर, ओन्ली पूजा फूटवेअर, स्वयम् मतिमंद मुलींची शाळा, श्री गणेश एंटरप्रायझेस, ब्रेन एक्स, मनालया कौन्सिलिंग सेंटर, स्मार्ट किडस् अबॅकस, डी डान्स झोन अकॅडमी, अक्षरसंस्कार हॅँडरायटिंग इन्स्टिट्यूट, सायकोसोशल अॅक्टिव्हिटीज फॉर रियलायझेशन अॅँड इंप्लोझिव्ह सर्व्हिस, द नीड, ज्ञानयोग मंदिरम्, मेमरी टेक्निक्स या नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत.
दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा
या प्रदर्शनस्थळी रविवार पेठेतील राजेंद्र ढवळे यांच्याकडील दुर्मीळ नाण्यांचे दर्शन घडणार आहे. यात जगातील ८० देशांतील नाण्यांचा तसेच भारतातील इ.स.पूर्वपासूनच्या नाण्यांचा समावेश आहे. तसेच ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे शनिवारी (दि. २६) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यासाठी ‘माझी रंगपंचमी’ विषय आहे.