लस घेऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:00+5:302021-05-03T04:18:00+5:30
भेडसगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण मोहीम प्रारंभप्रसंगी ते बोलत ते ...
भेडसगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण मोहीम प्रारंभप्रसंगी ते बोलत ते होते. मोहिमेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . फारुख देसाई यांच्या हस्ते करण्यात आले .
सभापती पाटील पुढे म्हणाले, ही प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण मोहीम ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
यावेळी या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील पहिले लसीकरण भेडसगावचे सरपंच अमरसिंह पाटील यांना करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हिरालाल निरंकारी, पोलीस निरीक्षक विजय पाटील, उपसरपंच सुनील पाटील, प्रा. आ. केंद्र भेडसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, डॉ. अक्षय पाटील, भेडसगाव आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, गट प्रर्वतक, आशा कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी
भेडसगाव येथे सरपंच अमरसिंह पाटील यांना लसीकरण करताना डॉ. फारूक देसाई, सोबत हंबीरराव पाटील, विजय पाटील, डॉ. हिरालाल निरंकारी, डॉ. नरेंद्र माळी, डॉ. अक्षय पाटील व अन्य.