एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:37+5:302021-02-18T04:42:37+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्राचे लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर अर्थ वाॅरियर्सतर्फे केवळ एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक ...

Let's get rid of our Kolhapur plastic waste in an hour | एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया

एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया

Next

कोल्हापूर : महाराष्ट्राचे लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर अर्थ वाॅरियर्सतर्फे केवळ एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया हा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती वाॅरियर्सचे संयोजक सुबोध भिंगार्डे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हे अभियान सकाळी ८ ते ९ या दरम्यान होणार आहे. यात प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, केईडब्ल्यूचे सर्व स्वयंसेवक, तरुण मंडळे, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आदी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. शहरामध्ये तीस भाग केले आहेत. त्यात १०० ते १५० संकलन केंद्रे उभी केली जाणार आहेत. या दिवशी शहरातील विविध ठिकाणी सहयोगी सदस्य उभे राहणार आहेत. त्यांच्याकडे सर्वजण असा प्लास्टिक कचरा नेऊन देतील. हे सहयोगी सदस्य तो पोत्यात भरतील. नऊ वाजेनंतर गोळा केलेली पोती महापालिका प्रशासन या केंद्रावरून गोळा करून ते पुनर्निर्मितीसाठी पाठविणार आहे. सध्या या संस्थेचे दोनशे सभासद असून, ते पर्यावरण जागृतीसाठी कार्यरत आहेत. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ईको-ब्रीक्सचा उपक्रम त्यांच्याकडून राबविला जात आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होऊन अभियानाचा योग्य प्रसार करावा, अशी विनंतीही भिंगार्डे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस विजय सावंत, युवराज गुरव, सीए अभिजित कुलकर्णी, आशिष कोंगळेकर, तात्या गोवावाला, परितोष उरकुडे, प्रमिला बत्तासे, तृप्ती देशपांडे, आदिती गर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Let's get rid of our Kolhapur plastic waste in an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.