अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ - राज्यमंत्री तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 04:48 PM2022-01-29T16:48:51+5:302022-01-29T17:10:53+5:30

पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Let's have a meeting with Deputy Chief Minister regarding Ambabai temple development plan says Minister of State Aditi Tatkare | अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ - राज्यमंत्री तटकरे

अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ - राज्यमंत्री तटकरे

Next

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराची वास्तू शिल्प कला अप्रतिम आहे. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा व यानुषंगाने अन्य बाबींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही पर्यटन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

राज्यमंत्री तटकरे या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.

यानंतर शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण आहे. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहेत.

आज माध्यमांचा वापर वाढला असला तरीही वृत्तपत्रांचे स्थान कायम आहे. वृत्तपत्र वाचून मगच दिवसाची सुरुवात करणारा मोठा वर्ग आहे.  वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. 

पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद 

पत्रकार सन्मान योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. 30 वर्ष पत्रकारिता केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Web Title: Let's have a meeting with Deputy Chief Minister regarding Ambabai temple development plan says Minister of State Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.