कसबा बीडमधील विरगळ पार्कसाठी मदत करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:28+5:302021-02-06T04:42:28+5:30

गावातील प्राचीन ऐतिहासिक स्थळांची केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क ( फोटो आहे) सावरवाडी : अकराव्या शतकातील प्राचीन संस्कृतीचा ...

Let's help for a secluded park in Kasba Beed | कसबा बीडमधील विरगळ पार्कसाठी मदत करू

कसबा बीडमधील विरगळ पार्कसाठी मदत करू

Next

गावातील प्राचीन ऐतिहासिक स्थळांची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क ( फोटो आहे)

सावरवाडी : अकराव्या शतकातील प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या आणि भोजराजाच्या राजधानीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. कसबा बीड (ता. करवीर) गावास गुरुवारी दिलेल्या भेटीप्रसंगी दौलत देसाई यांनी विविध भागांची पाहणी केली.

परिसरातील प्राचीन संस्कृतीचा ठेवा आलेल्या विरगळ पार्क, सुवर्ण राजधानीचा इतिहास हा नव्या पिढीला माहीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणे गरणेचे आहे. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी शंभो महादेव मंदिर परिसर, गणेश तलाव, लक्ष्मी तलाव या ठिकाणी जात ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. प्राचीन शिलालेख व विरगळ एकत्र करून भव्य 'विरगळ पार्क' करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी देसाई यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने कृती आराखडा बनवून सादर करावा. विकासासाठी भरघोस निधी आपण देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी देसाई यांनी ग्रामस्थांना दिले.

गावाच्या इतिहासाची माहिती डॉ. अमरजा निंबाळकर, राजाराम वरुटे व यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, तलाठी एन. पी. पाटील, सर्कल प्रवीण माने, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, अमित वरुटे, रोहिणी वरुटे, डी. एम. सूर्यवंशी, प्रकाश तिबिले, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार, सचिन वरुटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

( फोटो ०४ कसबा बीड देसाई

ओळ - कसबा बीड (ता. करवीर) येथील अकराव्या शतकातील प्राचीन विरगळ वस्तुसंग्रहालयास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी करवीर तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, डॉ. अमरजा निंबाळकर, राजेंद्र सूर्यवंशी, राजाराम वरुटे, अमित वरुटे, तलाठी एन. पी. पाटील, डी. एम. सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Let's help for a secluded park in Kasba Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.