कोल्हापूर जिल्हा एज्युकेशन हब करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:07+5:302020-12-26T04:19:07+5:30

: सांगरूळ शिक्षणसंस्था कृतज्ञता सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शिक्षक आमदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासात प्रथमच संधी देताना ...

Let's make Kolhapur District Education Hub | कोल्हापूर जिल्हा एज्युकेशन हब करूया

कोल्हापूर जिल्हा एज्युकेशन हब करूया

Next

: सांगरूळ शिक्षणसंस्था कृतज्ञता सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : शिक्षक आमदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासात प्रथमच संधी देताना पाचही जिल्ह्यांतील शिक्षण क्षेत्रातील घटकांनी आपला मोलाचा वाटा उचलून विक्रमी मतांनी आ. आसगावकर यांना निवडून आणले. म्हणूनच मिळणारा सर्व निधी त्यांनी केवळ शैक्षणिक कामासाठी लावून, कोल्हापूरचा नावलौकिक निर्माण करावा, असा सल्ला पालकमंत्री सतेज पाटील यांनी नूतन शिक्षक आ. प्रा. आसगावकर यांना दिला.

सांगरूळ शिक्षण संस्थेच्यावतीने विठाई हॉलमध्ये आयोजित कृतज्ञता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ना. सतेज पाटील बोलत होते. त्यांच्याहस्ते आ. आसगावकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी य. ल. खाडे होते.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरने एक वेळ ठरवलं की, ते राज्याला दिशा देणारे ठरते तसेच ज्या विश्वासाने पाच जिल्ह्यांतील शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाने जयंत आसगावकर यांना विजयी केले. तो सार्थ ठरविण्यासाठी आता पुढील काळात आ. आसगावकर यांनी जोरदार काम करायला हवे. संस्था व शिक्षक यांचे प्रश्न सोडवूच, पण शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व शिक्षण कसे देता येईल यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याच्या कामाला लागा, असे त्यांनी सांगितले.

पुरोगामी कोल्हापूर जिल्हा एज्युकेशन डेव्हलपमेंट स्कोरमध्ये १२ व्या स्थानावर आहे. यात नंदुरबार, सिंधुदुर्ग जिल्हे आघाडीवर आहेत. या जिल्ह्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहायला हवे. सांगरूळ शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने रात्रं-दिवस या निवडणुकीत जिद्दीने काम करून आपल्या संस्थेचा माणूस आमदार करण्यात योगदान दिले असल्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. जयंत आसगावकर म्हणाले, सांगरूळ शिक्षण संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीने घरदार सोडून माझ्यासाठी एक महिना काम केले. त्यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे.

यावेळी प्रा. पी. के. पाटील, शिवाजी पाटील, कृष्णात खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगरूळचे सरपंच सदाशिव खाडे, संचालक डी. जी. खाडे, के. ना. जाधव, इंदुमती आसगावकर, अनु आसगावकर व संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

// चौकट //

* मास्तरांच्या बरोबर बोलायचं म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, असं करून चालत नाही, संयम ठेवावा लागतो, हे निवडणुकीत मला शिकायला मिळाले, असे ना. सतेज पाटील म्हणताच एकच हशा पिकला.

* प्रचंड दबाव आणि आसगावकर यांची उमेदवारी फायनल आ. आसगावकर यांना उमेदवारी मिळविताना माझ्यावर प्रचंड दडपण आणण्यात आले होते. पण मी दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार करून आसगावकर यांच्या नावासाठी आग्रही राहिलो आणि तुमच्या सहकार्याने इतिहासात कोल्हापूरच्या माणसाला शिक्षक आमदार केले, तेही प्रचंड मताधिक्याने, असे ना. सतेज पाटील यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

-----------------------------------------------------------

(फोटो)

सांगरूळ शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात ना. सतेज पाटील यांच्याहस्ते नूतन आ. जयंत आसगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनु आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, उपाध्यक्ष के. ना. जाधव, संचालक डी. जी. खाडे, बी. आर. नाळे, कासोटे सरपंच सदाशिव खाडे.

Web Title: Let's make Kolhapur District Education Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.