म्हाळुंगे गाव आदर्श मॉडेल बनवू : राहुल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:40+5:302020-12-29T04:23:40+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे म्हणाल्या, गावच्या विकासात ग्रामस्थ व प्रशासनाने जबाबदारीने काम केल्यास निश्चितच गावचा विकास होतो. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे म्हणाल्या, गावच्या विकासात ग्रामस्थ व प्रशासनाने जबाबदारीने काम केल्यास निश्चितच गावचा विकास होतो. प्रकाश चौगले म्हणाले, गावचा विकास करत असताना शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून म्हाळुंगे हे राज्याच्या नकाशावर झळकवू.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकाकामांचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच पार्वती चौगले, उपसरपंच साताप्पा कांबळे, सदस्य मनीषा चौगले, दीपाली पाटील, सविता पाटील, विश्वास पाटील, सुभाष पाटील, प्रवीण गुरव, नीलम मोरे, युवराज चौगले, संपती पाटील, अर्चना कोठावळे, ग्रामसेवक एस. डी. पाटील उपस्थित होते.
फोटो ओळ : म्हाळुंगे (ता. करवीर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना सरपंच पार्वती चौगले, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, उदयानी साळुंखे.