महाविकास आघाडीच्या माध्यमातून राधानगरीला विकासाचे माॅडेल बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:26+5:302020-12-08T04:20:26+5:30

राधानगरी मतदारसंघ हा वाड्यावस्त्यांवर विखुरला आहे. येथे कोणताही औद्योगिक प्रकल्प नसल्याने येथील तरुणांना तालुका सोडून रोजगारासाठी जावे लागते ...

Let's make Radhanagari a model of development through Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या माध्यमातून राधानगरीला विकासाचे माॅडेल बनवू

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राधानगरीला विकासाचे माॅडेल बनवू

Next

राधानगरी मतदारसंघ हा वाड्यावस्त्यांवर विखुरला आहे. येथे कोणताही औद्योगिक प्रकल्प नसल्याने येथील तरुणांना तालुका सोडून रोजगारासाठी जावे लागते आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाविकासस आघाडीच्या सत्तेच्या माध्यमातून या मतदारसंघात विकासाचे नवीन माॅडेल बनवूया. यासाठी सर्वांनीच हातात हात घालून काम करूया, असे पाटील यांनी असे सांगून सहकारात संस्थाचालकांनी चांगले काम केले तर संभासदांनाही चांगले दिवस येतात. यासाठी संस्थाचालकांनी विश्वासाचे काम करावे, असे आवाहन केले.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

यावेळी ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश कवडे, आंनदराव कवडे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाला मंडल अधिकारी संदेश कदम, सरंपच सर्जेराव कवडे, अरुण जाधव, पांडुरंग भांदिगरे, राजेंद्र लोंखडे, मधुकर पाटील, पी. बी. पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुभाऊ किरुळकर यांनी केले. आभार संदेश कदम यांनी मानले.

Web Title: Let's make Radhanagari a model of development through Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.