‘संग्राम’ यांच्या मदतीची व्याजासह परतफेड करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:34+5:302021-04-24T04:24:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अडचणीच्या काळात संग्राम कुपेकर यांनी सत्तारूढ गटाला केेेलेल्या मदतीची भविष्यात व्याजासह परतफेड करू, अशी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अडचणीच्या काळात संग्राम कुपेकर यांनी सत्तारूढ गटाला केेेलेल्या मदतीची भविष्यात व्याजासह परतफेड करू, अशी ग्वाही माजी आ. महादेवराव महाडीक यांनी दिली.
शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांनी ‘गोकूळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीसोबत राहण्याचा निर्णय शुक्रवारी कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील बैठकीत घेतला, त्यावेळी महाडीक बोलत होते. माजी खा. धनंजय महाडीक म्हणाले, संग्राम कुपेकर यांनी योग्य वेळी निर्णय घेतला असून ती सत्तारूढ गटाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. भविष्यातील राजकारणात कुपेकर गटाला वाऱ्यावर सोडणार नाही.
संग्राम कुपेकर यांनी गटाची भूमिका मांडली. माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, माजी आ. संजय घाटगे, बाळासाहेब कुपेकर, भय्यासाहेब कुपेकर, सम्राट महाडीक, रणजितसिंह पाटील, प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी, भरण्णा गावडा, बी. एम. पाटील, भाई वाईंगडे, दिगंबर देसाई, वसंत नंदनवाडे, राजन महाडीक, सदानंद पाटील, उदयकुमार देसाई, बबनराव देसाई, अरुण पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित हाेते.
चौकट-
नऊ वर्षांनंतर महाडिक-कुपेकर मनोमिलन
महाडिक व कुपेकर यांच्यामध्ये नातेसबंध असले तरी आतापर्यंत राजकीय दिशा वेगवेगळीच राहिली. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर महाडिक व कुपेकर यांचे मनोमिलन झाल्याचे मानण्यात येते.
फोटो ओळी : शिवसेेनेचे संग्राम कुपेकर यांनी शुक्रवारी सत्तारूढ गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील बैठकीत महादेवराव महाडीक यांनी कुपेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संजय घाटगे, बाळासाहेब कुपेकर, भय्यासाहेब कुपेकर, भरमूण्णा पाटील, धनंजय महाडीक आदी उपस्थित होते. (फोटो-२३०४२०२१-कोल-कुपेकर)