चला घालूया सूर्यनमस्कार

By admin | Published: January 26, 2015 12:18 AM2015-01-26T00:18:03+5:302015-01-26T00:22:31+5:30

‘लोकमत’चा उपक्रम : शहाजी लॉ कॉलेज मैदानावर आयोजन

Let's run sunny salon | चला घालूया सूर्यनमस्कार

चला घालूया सूर्यनमस्कार

Next

कोल्हापूर : शारीरिक व्यायामांबाबत जागृती व्हावी या उद्देशाने ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून उद्या, मंगळवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता येथील शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेज प्रांगणात सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. उपक्रमात पतंजली योगपीठाचे तज्ज्ञ साधक मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोजच्या दगदगीच्या जीवनात, कामाच्या व्यापात शारीरिक व्यायामाचा विसर पडू लागला आहे. सततची धावपळ, ताणतणाव, खाण्यातील अनियमितपणा यांमुळे काही ना काही व्याधी जडल्यानंतरच व्यायामाची ओढ लागते. व्यायाम व शरीरसंपदेबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूनेच ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात भाग घेण्याची संधी शहर व परिसरातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासह कोल्हापुरातील स्त्री-पुरुष नागरिकांना मिळणार आहे. ‘लोकमत सखी मंच’ व बाल विकास मंचच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला शहाजी लॉ कॉलेज व्यवस्थापनाने सहकार्य केले आहे.
या उपक्रमात कोल्हापुरातील पतंजली योगपीठाचे शिक्षक चंद्रशेखर खापणे, डॉ. शरद हुन्सवाडकर, सूर्यकांत गायकवाड व दिव्या पालनकर तसेच ट्रस्टचे साधक मार्गदर्शन करणार आहेत. सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धत यांबाबत यावेळी माहिती मिळणार आहे.
‘लोकमत’तर्फे आयोजित ‘संकल्प करूया, सूर्यनमस्कार घालूया’ या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण येथील हिरो मोटो क्रॉप शेवरोले, फॉक्स वॅगन, रिनो या चार जगविख्यात कंपन्यांचे अधिकृत डीलर युनिक आॅटोमोबाईल्स हे आहेत.
ग्राहक सेवेसाठी ‘युनिक’च्या एकूण १५ शोरूम्स व दहा वर्कशॉप कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहनांची विक्री व पश्चात दर्जेदार सेवेसाठी ‘युनिक’ प्रसिद्ध आहे.
वेळ : सकाळी ६:३०
स्थळ : शाहूपुरी; शहाजी लॉ कॉलेज क्रीडांगण, सर्वांसाठी खुले
कार्यक्रमाची रुपरेषा
तीन वेळा ओंकार
सूर्यनमस्काराबद्दलची माहिती
रथसप्तमी व सूर्यनमस्काराचा संबंध
सूर्यनमस्कार-आध्यात्मिक व शरीरक्रिया शास्त्रीय विश्लेषण
सूर्यनमस्काराच्या बारा स्थितींचे वर्ण, योग्य स्थिती व फायदे
योगिक-जॉगिंग
१२ सूर्यनमस्कार घालणे
उंची संवर्धन योगासने व प्राणायामचे महत्त्व
भजन, गीते व शांती पाठ
योगपीठाचे शिक्षक चंद्रशेखर खापणे, डॉ. शरद हुन्सवाडकर, सूर्यकांत गायकवाड व दिव्या पालनकर हे सूर्यनमस्कार करवून घेणार आहेत.

Web Title: Let's run sunny salon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.