‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:19+5:302021-03-14T04:23:19+5:30

(राजू शेट्टी यांचा फोटो वापरावा) लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे ...

Let's show the strength of 'Swabhimani' in the election of 'Gokul' | ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू

‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू

Next

(राजू शेट्टी यांचा फोटो वापरावा)

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे काहीजण समजत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

‘गोकुळ’ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोण कोणाबरोबर राहणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भूमिका काय राहणार, याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. त्यात, ‘गोकुळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना विचारले असता, राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र सध्या तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत. अजून मला माहीत नाही, ते काय करणार आहेत. आमच्यासारख्यांना बरोबर घेणार आहेत की नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही आणि फरफटतही जाणार नाही. मात्र आम्ही आमची ताकद दाखवू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Web Title: Let's show the strength of 'Swabhimani' in the election of 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.