गांधीनगर बाजारपेठेतील प्रश्न मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:37+5:302021-03-13T04:42:37+5:30

: विविध विकासकामांचा शुभारंभ गांधीनगर : गांधीनगरसह संपूर्ण बाजारपेठेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही कोल्हापूर दक्षिणचे आमदार ...

Let's solve the problem in Gandhinagar market | गांधीनगर बाजारपेठेतील प्रश्न मार्गी लावू

गांधीनगर बाजारपेठेतील प्रश्न मार्गी लावू

Next

: विविध विकासकामांचा शुभारंभ

गांधीनगर : गांधीनगरसह संपूर्ण बाजारपेठेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. गांधीनगरमधील ४६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गुवालदास कट्यार होते. यावेळी गांधीनगरातील अंतर्गत रस्ते, गटर्स, विद्युतीकरण, खुली जागा विकास, काँक्रीटीकरण, रस्ते मुरुमीकरण खुली सभागृहे, अशा विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रताप चंदवाणी, मदनलाल मलाणी, माजी सरपंच प्रेम लालवाणी, गुड्डू सचदेव, धीरज टेहल्यानी, गणेश देवकुळे, महेश छाबरिया, सनी चंदवानी, हेमलता माने, जहिदा इनामदार उपस्थित होते.

फोटो :११ गांधीनगर पाटील

गांधीनगर (ता. करवीर )येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Let's solve the problem in Gandhinagar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.