शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू :जयंत आसगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:41 PM2021-02-09T18:41:43+5:302021-02-09T18:42:51+5:30
MLA Teacher Kolhapur- आगामी ५ वर्षात शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बचाराम काटे होते. यावेळी पंच्याहत्तरीबद्दल काटे यांचा सत्कार झाला.
गडहिंग्लज : आगामी ५ वर्षात शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बचाराम काटे होते. यावेळी पंच्याहत्तरीबद्दल काटे यांचा सत्कार झाला.
आसगावकर म्हणाले, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची जाण असणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. यावेळी आर. वाय. पाटील, डी. एस. घुगरे, सी. एस. मठपती, रमेश देसाई, ईश्वर स्वामी व काटे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास संदीप पाथरे, समीर घोरपडे, विनोद नाईकवाडी, हिंदूराव नौकुडकर, सुरेश थरकार, सतीश पाटोळे, रवींद्र शिऊडकर, सुरेश मगदूम, आनंदा वाघराळकर, नारायण घोलप, जोमाकांत पाटील, डी. व्ही. चव्हाण, अंजना घुळाण्णावर, आप्पासाहेब मटकर, विजय चौगुले, एस. एन. देसाई, टी. बी. चव्हाण, अजित कुलकर्णी, शमा कुरणे, आर. एस. पाटील, एन. एल. कांबळे, जयवंत वडर, दिलावर वाटंगी आदी उपस्थित होते.
तालुकध्यक्ष राजेंद्र खोराटे यांनी स्वागत केले. सचिव जे. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हाध्यक्ष के. बी. पोवार यांनी अतिथी परिचय करून दिला. रशिदा शेख यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य गंगाराम शिंदे यांनी आभार मानले.
यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव
हस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यात दहवी-बारावी परीक्षेतील यशवंत विद्यार्थी व १०० टक्के निकाल लावणाºया शाळा, स्वच्छ सुंदर आदर्श शाळा, नूतन व सेवानिवृत्त मुख्यध्यापकांचा यावेळी सत्कार झाला.
यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
गडहिंग्लज तालुक्यातून बाळासाहेब कुपटे (हरळी खुर्द), आजरा तालुक्यातून अनिल देसाई (वाटंगी) तर चंदगड तालुक्यातून ईश्वर स्वामी (माणगाव) यांचा गुरुवर्य बी.जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव झाला.