अंबाबाई मंदिर कायद्याची अंमलबजावणी त्वरित करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:26 AM2021-09-19T04:26:12+5:302021-09-19T04:26:12+5:30
अंबाबाई विश्वस्त कायद्याविषयी आणि त्याची अंमलबजावणी कशी असावी, याबद्दल समिती सदस्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. या ...
अंबाबाई विश्वस्त कायद्याविषयी आणि त्याची अंमलबजावणी कशी असावी, याबद्दल समिती सदस्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. या भेटीत डाॅ. सुभाष देसाई यांनी अंबाबाई विश्वस्त कायद्याची अंमलबजावणी कशी असावी, याबद्दल चर्चा झाली. याबाबतचे निवेदनही या समितीच्या शिष्टमंडळाने दिले. यात अंबाबाई मंदिरातील दान, दक्षिणा व दागिने, रोख रक्कम, उंची साड्या यांद्वारे वर्षाला साडेचारशे कोटी रुपये जमतात. त्यातील बहुतांश भाग पुजारी घेतात. त्यामुळे तो पैसा कायद्यानुसार शासनाच्या तिजोरीत गेला पाहिजे. त्याचा उपयोग जिल्ह्यात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी झाला पाहिजे. तीर्थक्षेत्र आराखडा फक्त ७० कोटी रुपयांचा आहे. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस भेडसावत आहेत. तेही यातून सुटू शकतील. यावेळी डाॅ. देसाई यांनी २००७ पासून कोल्हापूर हे बौद्ध संस्कृतीचे जागतिक पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. डाॅ. डी. वाय. पाटील कल्चरल ट्रस्टतर्फे संबंधित जागेची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे केली होती. त्या जागेचा पंचनामाही झाला होता; पण ती फाईल पुन्हा काढून त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. जिजाऊ ब्रिगेडच्या डाॅ. जयश्री चव्हाण यांनी देवीला येणाऱ्या पुजाऱ्यांकडच्या व देवस्थान समितीच्या साड्या या महापुरात आपत्तीग्रस्त झालेल्या कुटुंबांतील महिलांना द्याव्यात, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी या कायद्याची अंमलबाजवणी त्वरित करू, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. यावेळी दिलीप शेटे, संजय शेटे, महेश जाधव, माणिक मंडलिक, शेखर मंडलिक, दिगंबर जाधव, तुषार भिवटे, रमेश पुरेकर, शरद तांबट, आदी उपस्थित होते.