नियम, शिस्तीद्वारे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:21+5:302021-06-19T04:16:21+5:30
: वडणगेत अलगीकरण कक्षाचे उद्घाटन वडणगे : कोणतीही लढाई ही जनतेच्या सहकार्यातूनच जिंकता येते. त्याचप्रमाणे शिस्त आणि नियम ...
: वडणगेत अलगीकरण कक्षाचे उद्घाटन
वडणगे : कोणतीही लढाई ही जनतेच्या सहकार्यातूनच जिंकता येते. त्याचप्रमाणे शिस्त आणि नियम पाळून कोरोनाविरुद्धची लढाई लवकरच जिंकू या, असा विश्वास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.
वडणगे, ता. करवीर येथे ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड अलगिकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बलकवडे म्हणाले, पहिल्या लाटेत राबविलेल्या वडणगे पॅटर्नमुळे रुग्णांना दिलासा मिळाला होता. वडणगेकरांच्या एकजुटीमुळे गावातील कोरोनाची दुसरी लाटही लवकरच संपुष्टात येईल. डॉ. संदीप पाटील यांनी आरोग्याची काळजी, योगा, व्यायाम आणि आहाराचे महत्त्व सांगितले. यावेळी कोरानाच्या लढाईत योगदान देणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्यावतीने एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४० वाफेची मशिन देण्यात आली. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक अधीक्षक आर. आर. पाटील, सरपंच सचिन चौगले डॉ. मुराद कुलकर्णी, सुधाकर तोडकर, डॉ. प्रवीण लोहार, डॉ. अजित देवणे, डॉ. अभिजित गाडीवड्ड, रवींद्र पाटील, अजित पाटील, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उद्योगपती संदीप नष्टे, पोलीस पाटील उमेश नांगरे, उपसरपंच पूजा मिसाळ, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, दादासोा शेलार, केरबा शेलार उपस्थित होते.
फोटो : १८ वडणगे बलकवडे
ओळी :- वडणगे, ता. करवीर कोविड अलगिकरण कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. संदीप पाटील, बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच पूजा मिसाळ, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रवींद्र पाटील उपस्थित होते.