गट-तट न पाहता शिवसेना वाढीसाठी एकजुटीने काम करूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:43+5:302021-07-19T04:17:43+5:30
सेनापती कापशी (ता. कागल) येथे चिकोत्रा खोऱ्यातील शिवसैनिकांसाठी आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. यावेळी विजय देवणे ...
सेनापती कापशी (ता. कागल) येथे चिकोत्रा खोऱ्यातील शिवसैनिकांसाठी आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते.
यावेळी विजय देवणे म्हणाले, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे गावा-गावात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख, महिला तालुका प्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने पक्षवाढीसाठी काम करत आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना एक बलाढ्य पक्ष बनल्याचे सर्वांच्याच निदर्शनास येईल, असा विश्वास देवणे यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवली आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शिवसेनेचा कागल तालुक्यात विस्तार करून जि. प. व पं. समितीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी सक्रिय होऊया.
यावेळी कागल तालुका शिवसेनाप्रमुख शिवगोंड पाटील, अशोक पाटील, राजेंद्र येजरे, चंदू सांगले, महेश देशपांडे, मोहन मोरे, सुरेश मोरे, तानाजी पाटील, हसूर खुर्दचे सरपंच सुभाष भोसले, युवराज येजरे, अवधूत पाटील, सीमा गोरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळी:
सेनापती कापशी (ता. कागल) येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी बोलताना कागल विधानसभा संपर्क प्रमुख दिनकर जाधव, यावेळी विजय देवणे, संभाजी भोकरे आदी उपस्थित होते.