‘त्या’ पत्राने डाॅ. आंबेडकरांचे शिक्षण बंद होताना वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:13 AM2021-08-11T08:13:17+5:302021-08-11T08:14:30+5:30

पत्रव्यवहाराला १० ऑगस्ट रोजी शंभर वर्षे पूर्ण

letter that continued dr babasaheb ambedkars education | ‘त्या’ पत्राने डाॅ. आंबेडकरांचे शिक्षण बंद होताना वाचले

‘त्या’ पत्राने डाॅ. आंबेडकरांचे शिक्षण बंद होताना वाचले

googlenewsNext

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लंडनमध्ये असताना पैशांअभावी शिक्षण थांबविण्याची वेळ आली होती. पण चित्रकार दत्तोबा दळवी यांच्या माध्यमातून ही बाब राजर्षी शाहू महाराजांना कळली आणि त्यांनी तातडीने बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मंजूर करून पुढील शिक्षणाची सोय केली. यातील पत्रव्यवहाराला १० ऑगस्ट रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यातील दोन पत्रे दत्तोबा दळवी यांचे नातू चित्रकार अजेय दळवी यांच्या संग्रहात आजही सुरक्षित आहेत.

दत्तोबा दळवी हे दरबारी चित्रकार होतेच, शिवाय राजर्षी शाहू महाराजांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यामुळे महाराजांच्या संस्थान कारभारात दत्तोबा कायमच सक्रिय होते. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना एक वेळ अशी आली की, पैशांअभावी त्यांना पुढील शिक्षण थांबवावे लागणार होते. यादरम्यान बाबासाहेबांचा शाहू महाराज, दत्तोबा दळवी व रमाबाई आंबेडकर यांच्याशी पत्रव्यवहार झाला. दत्तोबा दळवी यांनी शाहू महाराजांना ही बाब सांगितली. त्यानंतर शाहू महाराजांनी तातडीने बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मंजूर करून पुढील शिक्षणाची सोय केली.

Web Title: letter that continued dr babasaheb ambedkars education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.