एक पत्र कोरोनामुक्त कोल्हापूरकरांसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:34+5:302021-07-15T04:17:34+5:30
शहापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्या मानाने लसीचा पुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी केंद्रांबाहेर दुसऱ्या डोससाठी ...
शहापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्या मानाने लसीचा पुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी केंद्रांबाहेर दुसऱ्या डोससाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. जिल्हा कोरोनामुक्त व्हावा, यासाठी ‘एक पत्र कोरोनामुक्त कोल्हापूरकरांसाठी’ हा उपक्रम राबवत असून, ते पत्र मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना टपालाद्वारे देणार असल्याचे युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये दुसऱ्या डोससह १८ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्यासाठी शासनाने घोषणा केली. परंतु, अजूनही लस देण्यात आली नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, यामध्ये मृत्यूसंख्या वाढत आहे. केंद्रामध्ये आठ दिवसातून एकदा लस मिळत आहे. ८४ दिवस होऊनही अनेकजण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असून, केंद्रांबाहेर रांगा लावल्या जात आहेत. जिल्ह्यामध्ये लसीचा पुरवठा व्हावा, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी व शिक्षकांनी प्रतिसाद देत आतापर्यंत दीड हजारांवर पत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात आली आहेत.