परिसंस्थाना मोकळा श्वास घेऊ देणे हेच त्यांचे पुनर्जिवीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:35+5:302021-06-06T04:17:35+5:30

कोल्हापूर : विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा अतोनात ऱ्हास होत आहे. त्यामुळे परिसंस्थांना पुन्हा मोकळा श्वास घेऊ देणे, हेच त्यांचे ...

Letting the ecosystem breathe is their rejuvenation | परिसंस्थाना मोकळा श्वास घेऊ देणे हेच त्यांचे पुनर्जिवीकरण

परिसंस्थाना मोकळा श्वास घेऊ देणे हेच त्यांचे पुनर्जिवीकरण

Next

कोल्हापूर : विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा अतोनात ऱ्हास होत आहे. त्यामुळे परिसंस्थांना पुन्हा मोकळा श्वास घेऊ देणे, हेच त्यांचे पुनर्जिवीकरण आहे, असे प्रतिपादन जैवविविधता संशोधक केंद्र कॅरॅमल कॉलेज फॉर वूमन गोवा येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व जैवविविधता तज्ज्ञ डॉ. मनोज बोरकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागातर्फे घेण्यात आलेल्या वेबीनारमध्ये ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.

जागतिक पर्यावरण दिनाचे आचित्य साधून शनिवारी विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागाच्या आवारात कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते वेलीचे व झाडाचे रोपण करण्यात आले. परिसंस्थेचे पुनर्जिवीकरण या विषयावर ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये पर्यावरणातील परिसंस्थेवर प्रकाश टाकतानाच बोरकर यांनी तारांतुला कोळ्यांचे परिसंस्थेतील स्थान आणि त्याच्याबाबतील संकटे यावरही अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम होत असतो. पृथ्वीतलावर ज्याप्रमाणे इतर प्राणिमात्रांची उपस्थिती आहे त्याप्रमाणेच एक मनुष्यप्राणी आहे. त्यामुळे माणसाने आपण वसुंधरेचे मालक नसून पृथ्वीवर आलेल्या एका पाहुण्याप्रमाणे राहावे, मालकी हक्क गाजवू नये, शाश्वत विकासाची कास धरून इथून पुढे तरी वसुंधरेवर होणारे आघात थांबवावेत, अशी भावना व्यक्त केली.

स्वागत आणि प्रास्ताविक पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी केले. प्राजक्ता सरकाळे हिने सूत्रसंचालन आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार डॉ. पल्लवी भोसले यांनी मानले. वेबिनारमध्ये विद्यार्थी वर्ग, शिक्षक, महाविद्यालयातील वर्ग, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींनी ऑनलाइन सहभाग घेतला.

०५०६२०२१-कोल-युनिर्व्हसिटी ०१

फोटो ओळ: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

०५०६२०२१ -कोल-युनिर्व्हसिटी ०२

फोटो ओळ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी शिवाजी विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागाने ‘परिसंस्थेचे पुनर्जिवीकरण’ या विषयावर वेबिनार घेतला. यात गोव्याचे जैवविविधता तज्ज्ञ डॉ. मनोज बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Letting the ecosystem breathe is their rejuvenation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.