चतुर्थश्रेणी कर्मचारी पदाऐवजी ठोक स्वरूपात ‘शिपाई भत्ता’ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:14+5:302020-12-14T04:37:14+5:30
या संवर्गातील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधित पदे व्यपगत होतील. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदाऐवजी यापुढे ठोक स्वरूपात शिपाई भत्ता ...
या संवर्गातील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधित पदे व्यपगत होतील. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदाऐवजी यापुढे ठोक स्वरूपात शिपाई भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.
ज्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये एकही चतुर्थश्रेणी पद कार्यरत नसेल, अशा शाळांना विहीत निकषानुसार पूर्ण शिपाई भत्ता देय राहील. ज्या शाळांमध्ये काही प्रमाणात चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत, अशा १०० टक्के अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये पूर्वीच्या आकृतिबंधाप्रमाणे अपेक्षित चतुर्थश्रेणी कर्मचारीपदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.
चतुर्थश्रेणीच्या रिक्त जागांपुरता संबंधित भत्ता १ एप्रिल २०१९ पासून लागू असेल व वेतनेत्तर अनुदानातून अदा करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीस स्वयंसहाय्यता, महिला बचत गट, स्थानिक महिला अथवा अन्य मार्गाने शिपाई भत्त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग करता येणार आहे.
अतिरिक्त चतुर्थश्रेणी कर्मचारी त्याच संस्थेत सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नजीकच्या शासकीय, जिल्हा परिषद कार्यालयात, अनुदानित अंशत: अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येणार आहेत. सेवानिवृत्तीनंतर ही अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील व त्यानंतर शिपाई भत्ता सुरू होणार आहे.
----------------------
(टीप : संबंधित बातमीसाठीची चौकट (क्यूएसडी) फाईल (जे/युझर/कोल) वर वर पाठवली आहे.)