भगवान येशूंचे जीवन मानवकल्याणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:42+5:302020-12-26T04:19:42+5:30
जयसिंगपूर : अवघ्या जगभरात साजरा होणारा पवित्र नाताळ सण हा प्रेम, शांती, मानवता आणि एकतेचे प्रतीक आहे. भगवान येशू ...
जयसिंगपूर : अवघ्या जगभरात साजरा होणारा पवित्र नाताळ सण हा प्रेम, शांती, मानवता आणि एकतेचे प्रतीक आहे. भगवान येशू ख्रिस्त यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवाच्या कल्याणासाठी वेचले. त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. जयसिंगपूर येथील चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांना आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी शुभेच्छा दिल्या. उदगाव, शिरोळ येथेही नाताळ सण साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून समाजबांधवांनी प्रार्थना केली. यावेळी मिलिंद शिंदे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
फोटो - २५१२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील चर्चमध्ये नाताळनिमित्त ख्रिश्चन बांधवांना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुभेच्छा दिल्या.