पेंटर चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात गणेशने भरले आनंदाचे रंग

By Admin | Published: July 26, 2014 12:40 AM2014-07-26T00:40:43+5:302014-07-26T00:45:33+5:30

कर्तृत्वाचा झेंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले;

In the life of Painter Chandrakant Mali, the color of joy filled with Ganesha | पेंटर चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात गणेशने भरले आनंदाचे रंग

पेंटर चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात गणेशने भरले आनंदाचे रंग

googlenewsNext

गणपती कोळी- कुरुंदवाड
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील गणेश माळीने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले; तर पोरांचं स्वप्न साकार होण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात बांध खुरपणाऱ्या आई अनिता यांच्या हातात यशाचे क्षितिज आणून दिले आहे; पण आपल्या मुलग्याने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. आज, शुक्रवारी पहाटे तीन वाजता गणेश माळीने कांस्यपदक मिळविले. आज सकाळी ही वार्ता कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणेशच्या आई-वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी, तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या.
कुरुंदवाड येथे दोन खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. चंद्रकांत हे बिल्डिंग पेंटर म्हणून मजुरीवर काम करतात, तर आई अनिता या दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करतात. गणेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणे आणि त्याच्या खुराकावर पैसा खर्च करण्याइतकी श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंत अफाट. त्यांनी गणेशला त्याची व्यायामाची आवड जोपासण्यासाठी आणखी कष्ट करायचे ठरविले.
वयाच्या १२ व्या वर्षी तो हर्क्युलस जिममध्ये दाखल झाला. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी त्याची आवड आणि चुणूक हेरली. त्यांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे ठरविले. साधारण वर्षभरापूर्वी तो हवाईदलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणेशनेही प्रशिक्षकांचा विश्वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्यपदकाच्या रूपाने मिळाले. आज गणेशने राष्ट्रकुल स्पर्धा गाजविली. आता तो आशियाई स्पर्धेत खेळेल; पण त्याचे अंतिम लक्ष्य अर्थातच आॅलिम्पिक असणार आहे. २0२0च्या टोकिओ आॅलिम्पिकसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्याचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले. आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी कितीही कष्ट करावयास ते तयार आहेत.

प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुलगासुद्धा क्रीडाक्षेत्रात थक्क करणारी कामगिरी करू शकतो, हे मला सिद्ध करावयाचे होते. गणेशच्या यशामुळे ते साध्य झाले आहे. भविष्यात तो यापेक्षा चांगली कामगिरी करू शकेल. त्याच्या वयाचा व अनुभवाचा विचार करता मी खूप आनंदी आहे.
- प्रदीप पाटील, कोच

Web Title: In the life of Painter Chandrakant Mali, the color of joy filled with Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.