कवितेच्या माध्यमातून जगणं समृद्ध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:13+5:302021-02-05T07:11:13+5:30
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ...
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. गणेश वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे, नामदेव कोळी यांना ‘पंडित आवळीकर काव्य पुरस्कार’ डॉ. गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र आणि विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.
पंडित आवळीकर हे समीक्षक म्हणून नावाजलेले, पण ते मूळचे कवी होते. कवितेवर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या नावे पुरस्कार देण्याला वेगळा अर्थ असल्याचे डॉ. गवस यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त कवींनी त्यांच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. अवनिश पाटील, प्रकाश पवार, पंकज पवार, खलिल मोमीन, वर्जेश सोळंकी, महेश लीला पंडित, बळवंत जेऊरकर यांच्यासह पंडित आवळीकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
संवेदना जागवण्याचे काम
साहित्याच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जागवण्याचे काम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी अधिविभागाने राबविलेल्या उपक्रमांनी केले असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. मराठी विभागाने गेल्या १५ दिवसांत राबविलेले उपक्रम खूप महत्त्वाचे ठरले. यापुढील काळातही त्यांनी भाषा संवर्धनाचे असे उपक्रम राबवावे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
फोटो (२८०१२०२१-कोल-आवळीकर अवॉर्ड फोटो) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते पंडित आवळीकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी डावीकडून सुप्रिया आवारे, पी. एस. पाटील, दिनकर मनवर, डी. टी. शिर्के, नामदेव कोळी, गणेश वसईकर, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे, प्रकाश पवार उपस्थित होते.