पूर ओसरलेल्या भागातून ४९५ टन कचरा व गाळ उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:49+5:302021-07-29T04:24:49+5:30

कोल्हापूर : शहरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचलेला आहे. पूर ओसरलेल्या भागातून बुधवारी ४९५ टन ...

Lift 495 tons of garbage and silt from the flood affected area | पूर ओसरलेल्या भागातून ४९५ टन कचरा व गाळ उठाव

पूर ओसरलेल्या भागातून ४९५ टन कचरा व गाळ उठाव

Next

कोल्हापूर : शहरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचलेला आहे. पूर ओसरलेल्या भागातून बुधवारी ४९५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. कचरा उठावानंतर औषधफवारणी व धूरफवारणी करण्याचेही काम जोरात सुरू आहे. नवी मुंबईवरून आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी येथे स्वच्छता केली .

बुधवारी शहरातील मस्कुती तलाव, पोवार गल्ली, शिगणापूर नाका, पंचगंगा हॉस्पिटल रोड, आखरी रास्ता, पंचगंगा तालीम, एमएससीबी रोड, गिरिजा चौक, दुधाळी पाठीमागील बाजू, गवत मंडई, विठोबा मंदिर, महाराणा प्रताप विद्यालय शाळा, खाडे पॅसेज, प्रिन्स राजाराम कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, राठोड गल्ली, नागाळा पार्क, महावीर कॉलेज रोड, रामानंदनगर परिसर, सीता कॉलनी, जामदार क्लब परिसर पंचगंगा हॉस्पिटल रोड, परीट गल्ली, पिकनिक पॉइंट, व्हिनस कॉर्नर शाहूपुरी, वृंदावन पार्क, कलेक्टर ऑफिस रोड, टायटन शोरूम ते व्हिनस कॉर्नर रोड, नागाळा पार्क, केव्हीज पार्क, रमणमळा, पोवार मळा, शाहूपुरी, कुंभारी गल्ली, पंचमुखी गणेश मंदिर या ठिकाणचा कचरा व गाळ उठाव करून स्वच्छता करण्यात आली.

त्या ठिकाणी औषधफवारणी व धूरफवारणी करण्यात आली.

यासाठी १४ जेसीबी, १२ डंपर, २६ ट्रॅक्टरमार्फत संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वॉर्ड सीमध्ये राष्ट्रवादी बचत गट, एकटी संस्था यांच्या स्वयंसेवकांनी, तसेच कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

फोटो क्रमांक - २८०७२०२१-कोल-केएमसी०१

ओळ-

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी कोल्हापुरातील शाहूपुरी, कुंभार गल्ली परिसरातील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

Web Title: Lift 495 tons of garbage and silt from the flood affected area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.