विसर्जनासाठी आलेल्या चौघांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 08:09 PM2017-09-05T20:09:42+5:302017-09-05T20:16:39+5:30
राजाराम बंधारा आणि पंचगंगा घाटावर गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडत असताना चार वेगवेगळ्या घटनेत चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
कोल्हापूर : राजाराम बंधारा आणि पंचगंगा घाटावर गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडत असताना चार वेगवेगळ्या घटनेत चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
मुडशिंगी येथील एका गणेश मंडळाची मूर्ति विसर्जित करण्यासाठी गेलेला सम्राट नगरकर ( वय २५, रा. मुडशिंगी) या युवकास पाण्यात बुडत असताना जीवदान देण्यात आले. ही घटना दुपारी घडली. नगरकर पाण्यात गटांगळ्या खात असताना फायरमन गणेश लकडे यांनी तत्काळ त्याला बाहेर काढले. यासाठी लकडे यांना नितीन श्रंगारे, दौलत राणे यांनी मदत केली.
दुसºया घटनेत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा येथील दस्तगीर मुल्ला (वय ५२) हे राजाराम बंधाºयातील पाण्यात बुडत असताना अग्निशमन दलाच्या श्यामराव पाटील, खानू शिंगाडे, उदय शिंदे या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले.
घरगुती गणपतीचे विसर्जन करतेवेळी पंचगंगा नदीवर सायंकाळी शनिवार पेठेतील ऋषिकेश संतोष सांगवडे हा मुलगा बुडत असताना त्याला दलाचे ड्रायव्हर सुनील वार्इंगडे आणि फायरमन मधुकर जाधव, प्रमोद मोरे यांनी वाचविले.
पंचगंगा नदीतच सायंकाळी ४.४५ वाजता एका व्यक्तीला पाण्यात बुडताना अग्निशमन दलाचे चीफ फायर आॅफिसर रणजित कोंडीबा चिले यांनी वाचविले. परंतु पाण्याबाहेर येताच या व्यक्तीने पलायन केल्याने त्याचे नाव समजू शकले नाही.