मेणबत्त्यांच्या प्रकाशात १८५७ च्या लढ्याला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:31+5:302020-12-06T04:25:31+5:30
कोल्हापूर : पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून इतिहास घडविलेल्या १८५७ च्या रक्तरंजीत लढ्याला साक्षीदार ठरलेल्या जुन्या राजवाड्यासमोर मेणबत्त्यांच्या प्रकाशात ...
कोल्हापूर : पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून इतिहास घडविलेल्या १८५७ च्या रक्तरंजीत लढ्याला साक्षीदार ठरलेल्या जुन्या राजवाड्यासमोर मेणबत्त्यांच्या प्रकाशात क्रांतिकारकांच्या लढ्याला उजाळा मिळाला. शनिवारी या लढ्याला १६३ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून मराठा महासंघाने हा कार्यक्रम घेतला.
भवानी मंडपातील जुन्या राजवाड्यात इंग्रजांच्या विरोधात लढताना अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांना फाशी देण्यात आली, तर अनेकांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. या रक्तरंजीत इतिहासाला उजाळा देऊन या शूर क्रांतिकारकांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गेली अनेक वर्षे मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येतो.
याही वर्षी या इतिहासाचे स्मरण व्हावे व त्याची प्रेरणा युवा पिढीला मिळावी म्हणून संपूर्ण माहितीसह या लढ्याचे नेतृत्व करणारे छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा डिजिटल फलक लावण्यात आला, मेणबत्त्या प्रज्वलित करून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिकारकांच्या व छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अवधूत पाटील यांनी स्वागत केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले. यावेळी बबन रानगे, प्रकाश पाटील, कादर मलबारी, शंकरराव शेळके, अनंत म्हाळुंगेकर, अशोक माळी, तय्यब मोमीन, महादेव पाटील, छत्रपती चिमासाहेब महाराज यांचे वंशज वैभवराजे राजेभोसले, शरद साळुंखे, गुरुदास जाधव, महेश मचले, तेजस्विनी नलवडे, अश्विनी पाटील, संतोष सावंत, संजीवनी चौगुले, रवी कांबळे, बाबूराव बोडके, लहू शिंदे उपस्थित होते.
फोटो: ०५१२२०२०-कोल-मराठा
फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी जुन्या राजवाड्यासमोर मराठा महासंघाने १८५७ च्या लढ्यातील क्रांतिकारकांना मेणबत्त्यांच्या प्रकाशात अभिवादन केले. (आदित्य वेल्हाळ)