कोल्हापूरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 PM2021-01-04T16:23:31+5:302021-01-04T16:30:21+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर नित्साही वातावरण राहिले, असून आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणाचा भाजीपाला, गुऱ्हाळघरे, वीटभट्यांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर नित्साही वातावरण राहिले, असून आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणाचा भाजीपाला, गुऱ्हाळघरे, वीटभट्यांचे नुकसान झाले आहे.
किमान तापमान खाली उतरले असले, तरी हवामानात बदल झाल्याने म्हणावी तशी थंडी पडली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी २४ तास स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.
माथेरान, नाशिक, मालेगाव, जळगाव, बारामती, पुणे, सांगली, महाबळेश्वर, सातारा, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या शहरांचे किमान तापमान १८ अंशाच्या खाली नोंदविण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान स्थिर आहे.