रेल्वेला मर्यादित, एसटीला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:32+5:302021-04-08T04:23:32+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध जाहीर केल्यानंतर राज्यासह परराज्यातून कोल्हापूरात येणाऱ्या नागरिकांची संख्या ...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध जाहीर केल्यानंतर राज्यासह परराज्यातून कोल्हापूरात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. रेल्वेगाड्या मुळातच मागील वर्षांपासून कमी प्रमाणात असल्यामुळे येणाऱ्यांची संख्या नगण्यच आहे. तर मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात काही प्रमाणात बुधवारी दुपारी गर्दी होती. विशेष म्हणजे अनेकजण लाॅकडाऊन होईल या भीतीपोटी आपापल्या गावी परतू लागले आहेत. पुण्यातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर कोल्हापुरातून इतर जिल्ह्यापेक्षा ग्रामीण भागात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी मिळेल त्या बसने आपले गाव गाठत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक प्रवासी कोणत्याही प्रकारचे कोरोनासंबंधीचे सुरक्षा पाळत नसल्याचे चित्र होते.
कोल्हापूरच्या शाहू छत्रपती टर्मिनन्स अर्थात कोल्हापूर रेल्वेस्थानकात बाहेर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. अनेकजण बाहेरून कोल्हापुरात दाखल होऊ लागले आहे. मागील वर्षी जे परप्रांतीय परराज्यात गेले होते. तेच आता लाॅकडाऊन झाला तर कोल्हापुरात काहीना काही तरी सोय होईल या उद्देशाने पुन्हा परतत आहेत. तर कोरोनाचा पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा कोल्हापुरात दाखल झाले ते पुन्हा गावी जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकात तुरळक वर्दळ होती.
प्रतिक्रिया
कोल्हापुरात कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. मूळ गावी अनेक प्रश्न, अडचणी आहेत. त्यामुळे मी पुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने कोल्हापुरात दाखल झालो आहे.
- जयप्रकाश तिवारी, बिहार
प्रतिक्रिया
आपल्या गावी आपल्या माणसांत आल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती सहज निभावून नेता येते. त्यामुळे मी पुण्याहून कोल्हापुरात आलो.
- शिवराज घोरपडे, कोल्हापूर
फोटो : ०७०४२०२१-कोल-एसटी०१,
आेळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी अशी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी अशी गर्दी केली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कोरोनासंबधी सुरक्षा मानके पाळली जात नसल्याचे चित्र होते.
फोटो : ०७०४२०२१-कोल-एसटी०२
आेळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी दुपारी प्रवाशांनी आपल्या गावी जाण्यासाठी अशी गर्दी केली होती.
फोटो : ०७०४२०२१-कोल-रेल्वे
कोल्हापुरातील शाहू छत्रपती रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी धनबाद एक्सप्रेस आल्यानंतर काही प्रमाणात गर्दी झाली होती.
(सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)