लिंगनूरकरांनी घातला अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:20+5:302021-03-13T04:46:20+5:30

वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या या रस्त्याचे काम अपुरे असल्याने धूळ उडत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकामचे ...

Lingnurkar laid siege to the authorities | लिंगनूरकरांनी घातला अधिकाऱ्यांना घेराव

लिंगनूरकरांनी घातला अधिकाऱ्यांना घेराव

Next

वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या या रस्त्याचे काम अपुरे असल्याने धूळ उडत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उप अभियंता अमित पाटील, किल्लेदार, ठेकेदार कंपनीचे देशपांडे, मुरगेश्वर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. यावेळी माजी सरपंच मयूर आवळेकर, सरपंच स्वप्निल कांबळे, काॅ. हरिदास पोवार, शिवाजी मेथे, डॉ. प्रवीण जाधव, किरण आवळेकर, काॅ. नंदकुमार किल्लेदार, दत्ता आवळेकर, अशोक मडके, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी सरपंचाचा असाही चाणाक्षपणा... मावळते सरपंच मयूर आवळेकर हे बसस्थानक परिसरात एका हाॅटेलमध्ये चहा घेत होते. यावेळी मुरगूडकडून निपाणीकडे अधिकाऱ्यांच्या गाड्या जाताना दिसल्या. त्यांना हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत गाडी पुढे नेली. यावेळी आवळेकर यांनी या गाड्यांचा एक कि.मी. अंतरापर्यंत पाठलाग करीत अधिकाऱ्यांना थांबविले. याची माहिती गावकऱ्यांना समजताच युवकही दाखल झाले.

Web Title: Lingnurkar laid siege to the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.