प्रेसमधून सव्वा लाखाची रोकड लंपास, दोघे संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:42 PM2019-02-05T13:42:35+5:302019-02-05T13:43:40+5:30
वायपी पोवार नगर येथील प्रेसच्या मुख दरवाजाची कुलपे तोडून चोरट्यांनी कामगारांचे पगार भागविणेकरीता जमा केलेली सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे कॅमेराबध्द झाले होते. त्यांना राजारामपूरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर : वायपी पोवार नगर येथील प्रेसच्या मुख दरवाजाची कुलपे तोडून चोरट्यांनी कामगारांचे पगार भागविणेकरीता जमा केलेली सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे कॅमेराबध्द झाले होते. त्यांना राजारामपूरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, बाळासो शिवाजी कवडे (वय ४८, रा. फुलेवाडी) यांची वायपी पोवार नगरमध्ये अनेक वर्षापासून छपाई प्रिटींग प्रेस आहे. रविवार (दि. ३) रात्री दहाच्या सुमारास प्रेस बंद करुन ते घरी गेले. सोमवारी कामगारांचे पगार भागविण्यासाठी त्यांनी कामाचे जमा झालेले सव्वा लाख बिलाची रोकड कॅश कॉन्टरमध्ये ठेवली होती.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते प्रेसवर आले असता मुख दरवाजाची कुलपे तुटलेली दिसली. आतमध्ये पाहिले असता टेबलच्या कॉऊन्टरमधील रोकड लंपास असल्याचे दिसून आले. त्यांनी राजारामपूरी पोलीसात फिर्याद दिली. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडे कसून चौकशी सुरु आहे.