कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

By उद्धव गोडसे | Published: March 2, 2023 04:05 PM2023-03-02T16:05:25+5:302023-03-02T16:13:33+5:30

विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने निघाला होता घेऊन

Liquor worth 35 lakh seized near Kini in Kolhapur, one arrested | कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

googlenewsNext

कोल्हापूर : विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने घेऊन जाणारा कंटेनर पकडून ३५ लाख ५३ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी गावाजवळ आज, गुरुवारी (दि. २) सकाळी कारवाई केली. कंटेनरचालक दिनेश जेकनराम कुमार (वय ३०, रा. कावोकी बेरी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पथकाने अटक केली.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरून एका सहाचाकी कंटेनरमधून विदेशी मद्यसाठा मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यानुसार तडवी यांनी निरीक्षक एस. जे. डेरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. महामार्गावर किणी गावाजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने गुरुवारी सकाळी एक संशयित वाहन अडवले. त्याची झडती घेताना विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळले. पथकाने ३५ लाख ५३ हजार २०० रुपयांचे मद्य आणि ११ लाख रुपयांचा कंटेनर असा ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कंटेनर चालक दिनेश कुमार याला अटक केली असून, मद्यसाठा कुठून आणला आणि कोणाला पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Liquor worth 35 lakh seized near Kini in Kolhapur, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.