पवित्र पोर्टलवर शिक्षकांची यादी प्रसिद्ध, कोल्हापूरला मिळाले ५७९ शिक्षक
By समीर देशपांडे | Published: February 27, 2024 02:12 PM2024-02-27T14:12:50+5:302024-02-27T14:13:17+5:30
कागदपत्रे पडताळणीआधीच सोयीच्या शाळेसाठी धडपड
कोल्हापूर : जिल्हा परिषदेला नवे ५७९ प्राथमिक शिक्षक उपलब्ध झाले असुन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि समुपदेशनाव्दारे नियुक्ती या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने येणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षातच त्यांच्या कामाची सुरूवात होणार आहे. मात्र एकीकडे कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियाही अजून सुरू झाली नसताना सोयीचा तालुका आणि सोयची शाळा मिळावी यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी ५७९ शिक्षकांची यादी रविवारी रात्री पवित्र पोटर्लवर प्रसिध्द झाली. जिल्ह्यात ८१६ आणि राज्यभरात २१ हजार ६७८ पदांसाठी शिक्षक भरतीच्या जाहिराती शासनाने ५ फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिध्द केल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर पसंतीनुरूप प्राधान्यक्रम ऑनलाईन पध्दतीने भरले होते. शिक्षक पद भरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या शाळांतील ११ हजार ०८५ उमेदवारांची ही गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.