निसर्गातूनच साहित्य साकारते : कृष्णात खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:40 AM2019-01-12T00:40:27+5:302019-01-12T00:40:47+5:30
कोल्हापूर : निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला चांगले शब्द सुचतात आणि त्या शब्दांतून साहित्य साकारते, असे प्रतिपादन ...
कोल्हापूर : निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला चांगले शब्द सुचतात आणि त्या शब्दांतून साहित्य साकारते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांनी शुक्रवारी केले.
येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, माती, पाणी आणि आपल्या सभोवतालशी बोला, नक्की चांगलंच लिहाल.
इयत्ता १0 वीत शिकणाºया रेश्मा राठोड या विद्यार्थिनीने स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या भाषणात फक्त रेकॉर्ड डान्सभोवती गुरफटलेल्या आणि गेल्या काही वर्षांतील बदललेल्या हिडीस स्वरूपाच्या स्नेहसंमेलनावर आपले मत व्यक्त केले. या शाळेच्या बाल स्नेहसंमेलनाचा आदर्श यावर्षी इतर शाळांनी घेतल्याचा आवर्जून उल्लेखही तिने आपल्या भाषणात केला.
‘जात आमुची पुसू नका, धर्म आमुचा पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा, गंध कोणता पुसू नका’ अशा काव्यपंक्तीने विद्यार्थ्यांनी काव्यसंमेलनातही रंगत आणली. आपल्या सुंदर अभिनयाने घरातील पालकांचे मुलांशी असलेले नाते सांगताना विशाल सावंत म्हणाला, ‘टी. व्ही.ला हात लावू नको, बरणी हातात घेऊ नको, फुटून जाईल ...’ शोभा जाधव हिने पाण्याचे महत्त्व सांगितले. या कविसंमेलनात विद्यार्थ्यांसोबत बालकवी अशोक पाटील आणि संभाजी चौगुलेही सहभागी झाले. तर कथाकथन सत्रात बालसाहित्यिक मा. ग. गुरव आणि मनीषा झेले यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या कथा सादर केल्या.
या संमेलनाची जबाबदारी सविता प्रभावले, संजय गुरव, मानसी सरनाईक, अमर चोपडे, सागर संकपाळ, आण्णापा माळी, अमर जगताप या विद्यार्थ्यांनी सांभाळली.
‘गांधी फॉर टुमारो’पथनाट्याने समारोप
वर्धा येथील सर्वोदयी शाळेतील शिक्षकाने लिहिलेल्या ‘गांधी फॉर टुमारो’ या पथनाट्याने या संमेलनाचा आज, शनिवारी समारोप होत आहे. हे पथनाट्य संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केले आहे. तीन सत्रांत आज, शनिवारी पथनाट्यासह गीतगायन, पर्यावरणविषयक लघुपट आणि लोकनृत्यांचा समावेश आहे. निर्मला शितोळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वारकºयांच्या वेशात विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी
या संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. वारकºयांच्या वेशात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून ग्रंथदिंडी काढली. तिचे उद्घाटन शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी केले. यावेळी मेघराज खराडे, शिवतेज खराडे, मुुख्याध्यापक प्रवीण काटकर उपस्थित होते.