पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:12 AM2018-11-07T01:12:57+5:302018-11-07T01:13:37+5:30

आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. यावर्षी नऊ महिन्यांत तब्बल २५ हजार १९० रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे.

Lives of 25,000 patients: Kolhapur 108 Ambulance Benefit | पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ महिन्यांतील स्थिती; सर्वसामान्यांसाठी ‘वरदान’

गणेश शिंदे।
कोल्हापूर : आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. यावर्षी नऊ महिन्यांत तब्बल २५ हजार १९० रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. किंबहुना त्यांचे प्राण वाचविण्यात या सेवेचा उपयोग झाला आहे. विशेषत: रस्त्यांवरील अपघात आणि प्रसूतिच्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार झाले आहेत.

राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १०८ नंबर रुग्णवाहिका सेवा २६ जानेवारी २०१४ ला सुरू झाली. रस्त्यांवरील अपघात, मारामारी, भाजणे, हृदयाचे आजार, विषबाधा, प्रसूती, विद्युत धक्का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि सर्वप्रकारचे रुग्ण अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा याद्वारे मिळतात.

गेल्या वर्षी एक जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ अखेर पाच हजार ४८७, तर यावर्षी याच कालावधीत तब्बल २५ हजार १९० अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा मिळाली. आता त्यात तब्बल पाचपट वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, कोणताही अपघात झाल्यास त्या रुग्णाला तत्काळ कोणत्याही रुग्णालयात तत्काळ घेऊन जाऊन उपचार करणे. तसेच गर्भवतीची प्रसूती कोणत्याही (सरकारी, खासगी) रुग्णालयात व्हावी, असे सरकारचे धोरण आहे. सध्या रस्त्यांवरील अपघातांचे व प्रसूतीचे ा्रमाण वाढले आहे. या नऊ महिन्यांत या रुग्णवाहिकेने आपत्कालीनमध्ये ४२ हजार २१७ जणांना सेवा दिली.

गतवर्षी ही सेवा १९ हजार ५५८ जणांना देण्यात आली. दरम्यान, घटना घडल्यापासून अवघ्या दहा मिनिटांत १०८ नंबरची रुग्णवाहिका घटनास्थळी येते. त्यासाठी आजऱ्यापासून ते वडणगेपर्यंत आणि कळेपासून ते जयसिंगपूरपर्यंत ही सेवा मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही रुग्णवाहिका उपयोगी पडत आहे.

कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपात
१०८ नंबरच्या ३६ रुग्णवाहिका
(अ‍ॅडव्हान्स्ड सपोर्ट लाईफ आठ,
तर बेसिक लाईफ सपोर्ट २८)
वैद्यकीय अधिकारी - १२०
चालक - ८४
सर्वप्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे

 

समाजात जनजागृती झाल्याने कांही झाले तर लोक लगेच १०८ नंबर रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत. त्यामुळे सेवा दिलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ती जास्तीत लोकांना उपयोगी पडावी असाच आमचा प्रयत्न आहे.
- संग्राम मोरे, जिल्हा व्यवस्थापक, १०८ नंबर रुग्णवाहिका, कोल्हापूर.

Web Title: Lives of 25,000 patients: Kolhapur 108 Ambulance Benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.