सरोगसीसाठी हवी स्थानिक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 12:40 AM2016-08-28T00:40:54+5:302016-08-28T00:40:54+5:30

व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी धोरण : गरजूंवर अन्याय होण्याची शक्यता

Local Committee for Surrogacy | सरोगसीसाठी हवी स्थानिक समिती

सरोगसीसाठी हवी स्थानिक समिती

googlenewsNext

कोल्हापूर : सरोगसीद्वारे होणारे मातृत्वाचे व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणात ‘सरोगेट मदर’ ही नात्यातील असावी व एक मूल असलेल्या दाम्पत्यांना सरोगसीद्वारे दुसरे मूल जन्माला घालता येणार नाही, अशी तरतूद आहे. मात्र या तरतुदीमुळे अपत्याची गरज असलेल्या व्यक्तींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तो होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर शासकीय समितीची नेमणूक होणे गरजेचे आहे.
जाहीर केलेल्या धोरणानुसार फक्त स्त्री किंवा पुरुष अशा एकल पालकत्वाला परवानगी नाही. परदेशी दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी भारतीय महिलांचा पर्याय वापरता येणार नाही. मातृत्वाचे व्यावसायीकरण रोखण्याच्या दृष्टीने हे नियम केले गेले ंआहेत. एक मूल झाल्यानंतर काही वेळा महिलेच्या गर्भाशयात दोष निर्माण होणे, दुर्धर आजार होणे अशा अडचणी येऊ शकतात. त्यावेळी सरोगसी हा पर्याय असू शकतो.
मात्र नव्या धोरणानुसार दुसऱ्या अपत्यासाठी सरोगेट मदर वापरता येणार नाही; त्यामुळे पालकांना दुसऱ्या अपत्यापासून वंचित राहावे लागेल. सरोगेट मदर ही नात्यातील असावी, अशी एक तरतूद या धोरणात आहे. मात्र दरवेळी नात्यातील महिला सरोगसीसाठी उपलब्ध असू शकेलच, असे नाही. त्यामुळे बाहेरच्या महिलेला सरोगसीसाठी अनुमती मिळणे गरजेचे आहे. व्यावसायीकरण रोखण्यासाठी दाम्पत्याची पालकत्वाची गरज, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सरोगसीसाठीची अनुमती यासाठी स्वतंत्र स्थानिक समिती नियुक्त करण्यात यावी, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात स्थिती समाधानकारक
मोठ्या शहरांमध्ये ‘सरोगेट मदर’ हा व्यवसाय झाला असला तरी कोल्हापुरात अद्याप अशी स्थिती नाही. अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद देण्यासाठी म्हणूनच सरोगेट मदरचा पर्याय वापरण्यात आला आहे. कोल्हापुरात आई, बहीण, जाऊ अशा नात्यातील महिलाच सरोगेट मदर झाल्याची उदाहरणे आहेत. याशिवाय बाहेरच्या महिलेशी नियमानुसार ठरावीक रकमेचा करार करून अनेक दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला आहे.
व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी सरोगसी मातृत्वावर काही बंधने आणली गेली असली तरी त्यातील काही तरतुदी अडचणीच्या ठरणार आहेत. सुदैवाने कोल्हापुरात सरोगसीचा व्यवसायासाठी वापर केला जात नाही. उलट यामुळे अनेक दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळाल्याचा अनुभव आहे.
- डॉ. सतीश पत्की

Web Title: Local Committee for Surrogacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.